ज्यांना स्वत:चं भविष्य माहीत नाही ते…; ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर घणाघात

0
1225
eknath shinde uddhav thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्यांना स्वत:चं भविष्य माहीत नाही ते आपलं भविष्य ठरवणार असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. आज बुलढाणा जिल्ह्यात उद्धव ठाकरेंचा शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी आपल्या जाहीर सभेत त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे .

उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या आठवड्यात हे हात दाखवायला गेले होते. ज्याचं भविष्य त्याला माहीत नाही तो आपलं भविष्य ठरवणार. तुमचं भविष्य सर्वांना माहीत आहे. यांचे मायबाप दिल्लीत आहेत. तुमचं भविष्य ठरविणारे दिल्लीत बसलेत . त्यांनी उठ म्हटलं की उठायचं बस म्हटलं की बसायचं… अन् हिंदुत्व वाचवायला शिवसेना सोडून निघाले, असा टोला ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना लगावला.

यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवरही जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप हा आयात पक्ष झालाय. त्यांच्या पक्षातील नेते पाहिल्यानंतर बाहेरच्या पक्षातील नेते जास्त असल्याचं दिसतेय. हा पक्ष आहे का चोरबाजार आहे. यांच्याकडे काहीच शिल्लक राहिलं नाही. यांचे विचार संपले आहेत. नेते संपले आहेत असं म्हणत त्यांनी भाजपवर तोफ डागली.