हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे ऍक्शन मोडवर आले आहेत. आज त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. माझे आणि अमित शहा यांच्याशी बोलून ठरेल होते कि, भाजप व शिवसेना यांची युती करून अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री शिवसेनेचा करावा. मात्र, त्यावेळी तसे झाले नाही. ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन केले आणि ज्याने सरकार स्थापन केले. त्यांनी तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले. हेच तर मी अडीच वर्षांपूर्वी सांगत होतो जे आज झाले तेच आधी सन्मानाने झाले असते. आणि महाविकास आघाडीचा जन्म झाला नसता. मात्र, त्या वेळेला नकार देऊन हे आत्ता असे का केले ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवन या ठिकाणी जाऊन शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली तसेच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज मुंबईकरांच्या वतीने हात जोडून विनंती केली करत आहे कि आरेबाबत योग्य तो निर्णय घ्या. माझ्यामुळे मुंबईकरांचे नुकसान करू नका. मला दु:ख झालंय ते म्हणजे माझा राग मुंबईवर काढू नका. आरेचा निर्णय त्यांनी बदलला त्याने मला दु:ख झालं आहे. रात्रीस खेळ चाले, हे त्यांचं आता ब्रीदवाक्य आहे. एका रात्रीत आरेमध्ये झाडांची कत्तल झाली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्याला कांजूरमार्गचा पर्याय सुचवला. कामावर स्थगिती दिली. मी पर्यावरणवाद्यांच्या सोबत आहे. संभ्रम निर्माण होतो, तेव्हा ती गोष्ट टाळलेली बरी असं माझं मत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांचा प्रसार माध्यमांशी संवाद | शिवसेना भवन – LIVE https://t.co/X6BEWn8wtb
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) July 1, 2022
अडीच वर्षांपूर्वी अमित शहा यांच्याशी बोलून अशीच मागणी केली होती कि शिवसेना व भाजपमध्ये युती करावी आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री करावा. मात्र, त्यावेळी ऐकले नाही. आणि आता तथाकथित शिवसेनेचा मुख्यमंत्री केला आहे. त्यामुळे शिवसैनिकांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. अडीच वर्षांपूर्वी शिवसेना म्हणून अधिकृत तुमच्या बरोबर होतो. मला का मुख्यमंत्री बनायला लावले? आणि आताच अडीच वर्षानंतर असे का घडले? त्यांनी तथाकथित शिवसैनिकाला आता का मुख्यमंत्री केला. तेव्हा जर ऐकले असते तर अडीच वर्षासाठी तर भाजपचा मुख्यमंत्री झाला असता मात्र, तसे झाले नाही, असे ठाकरे यांनी म्हंटले.
लोकशाहीच्या चार स्तंभ लोकशाही वाचावी
यावेळी उद्धव ठाकरे यांनी लोकशाही धोक्यात असल्याचे सांगितले. यावेळी ते म्हणाले की, लोकशाहीचे चार स्तंभ आहेत, यांनी पुढे आलं पाहिजे लोकशाही वाचवायला कारण लोकांचा विश्वास उडत चालला आहे. गुप्त मतदानाची पद्धत आहे, पण निदान ज्यांनी मतदान केलेलं आहे त्याला तरी कळलं पाहिजे की कोणाला मतदान केलं आहे ते, मतदाराचाही लोकशाही वरील विश्वास रहाणार नाही. मतदाराने मत देऊन निवडुन दिलेल्या लोकप्रतिनिधीला परत बोलण्याचा अधिकार पाहिजे, असे ठाकरे यांनी म्हंटले.