हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे देखील कंबर कसली असून गोव्यात शिवसेना 22 जागांवर लढेल अशी घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली होती. तसेच गोव्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे सुद्धा गोव्यात प्रचाराला येणार आहेत असं संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत म्हणाले, आम्ही यापूर्वी देखील गोव्यात निवडणूक लढलो होतो. पण कुणाबरोबर युती केल्याने 2 ते 3 जागा वाट्याला यायच्या. मागच्यावेळीही गोवा सुरक्षा मंचशी युती केली. त्यावेळी 3 जागा वाट्याला आल्या. पण यावेळी 22 जागा लढत आहोत. आम्ही आमच्या बळावर लढतो आहोत, असं राऊत यांनी सांगितलं
सगळ्या पक्षांबद्दल गोवेकर जनतेच्या मनात रोष आहे. एका पक्षाच्या भरवशावर लोक निवडून येतात आणि 24 तासात पक्ष बदलतात. आज गोव्यात भाजपचं सरकारच नाही. भाजपचे किती आमदार निवडून आले होते? सगळे काँग्रेसचे आमदार फोडले आणि सरकार बनवले. बेडूक उड्या मारण्याचं काम गोव्याच्या राजकारणात सुरू आहे आणि त्यामूळे गोव्याचे डबके झाले आहे असा टोला राऊतांनी लगावला.