मुंबई प्रतिनिधी | शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे १६ जून रोजी अयोध्येला जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर वरून दिली आहे. मागील काही दिवसापासून उद्धव ठाकरे आयोध्येला जाणार असल्याच्या चर्चाना वेग आला होता. त्यावर आज संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर वरून या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख्य उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौरा काढण्याचा निर्णय का घेतला या बद्दल राजकीय तर्क वितर्क नोंदवले जात आहेत. विधान सभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून देखील उद्धव ठाकरे अयोध्येला जात आहेत असे देखील बोलले जाते आहे. तर शिवसेनेला चंद्रकांत पाटील यांनी सांगितलेला फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला मंजूर नाही. त्यामुळे शिवसेना भाजपवर दबाव टाकण्यासाठी हि खेळी खेळत आहे असे देखील बोलले जाते आहे.
उद्धव ठाकरे यांच्या सोबत अयोध्या यात्रेसाठी त्यांचे सर्व आमदार आणि खासदार जाणार आहेत. या आधी देखील उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांना जनतेचा व्यापक पाठींबा मिळाला होता.