सत्ताधारी विरोधकांचा कलगीतुरा; मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांचा खरपूस समाचार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
टीम, HELLO महाराष्ट्र। विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरवात झाल्यापासून विरोधी पक्षाने आक्रमक पवित्र घेत मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. पाहिल्यादिवशी सावरकरांच्या मुद्यावरून तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी शेतकरी प्रश्नावरून विरोधकांनी अकर्मक पवित्र घेतला. अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या सर्वांचा चांगलाच समाचार घेतला आहे. 
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल सामनाच दाखल देत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. त्याचा आता ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जिवावर सेनेचा मुख्यमंत्री बनवू, असा शब्द बाळासाहेबांना दिला होता का?’,फडणवीसांच्या या प्रश्नाला उद्धव ठाकरेंनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. दिलेल्या शब्दाचं कौतुक फडणवीस तुम्हाला कधीपासून झालं?, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. वडिलांना दिलेला शब्द पाळण्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन, मी त्या थराला गेलो आणि करून दाखवलं. भाजपाची पालखी कायम वाहणार नाही, हाही शब्द बाळासाहेबांना दिला असल्याचा टोलाही ठाकरेंनी यावेळी लगावला.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही दिलेलं वचन पाळतो, यापुढेही पाळणार आहोत. बाळासाहेबांना दिलेलं वचन पूर्ण केलं आहे. सुरू असलेले संसार भाजपाने मोडले, लालू आणि नितीश यांची युती तुम्हीच तोडलीत. राज्यावर कर्जाचा मोठा डोंगर आहे. तर देशाची आर्थिक स्थिती कोमामध्ये आहे. मेक इन इंडियात किती करार झाले? गुंतवणूक आली पण पुढे काय झालं?, इतर देशातील हिंदू घ्या, पण त्यांना ठेवणार कुठे, निर्वासितांची काळजी वाहणार कोण?, असे अनेक प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले आहेत. सीमाभागातील मराठी बांधव इतके आक्रोश करत आहेत, तुमचं सरकार असताना तुम्ही काय केलं?, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे.