007 मधलं आता 7 जाणार अन् फक्त 00 राहणार – उद्धव ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा लोकसभा मतदार संघ भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार नरेंन्द्र पाटील आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यातील शाब्दिक चकमकिंमुळे चांगलाच चर्चेत आहे. आता कराड येथील जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट उदयनराजेंना चॅलेंज दिलंय. आता 007 मधील 7 जाणरंय आणि फक्त 00 राहणारंय असं म्हणत ठाकरे यांनी शिवसेनेचे उमेदवार नरेंन्द्र पाटील यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय.

शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानते. नरेंन्द्र पाटीलांचे पण आदर्श शिवाजी महाराज हेच आहेत. काही जण जेम्सबाॅन्डला आदर्श मानतात. सगळीकडं 007 नंबर घेतात. आता त्या 007 मधलं 7 जाणार अन् फक्त 00 राहणार असं म्हणत ठाकरे यांनी उदयनराजेंवर टीका केलीय.

तसेच देशप्रेमी मुसलमान आमच्याकडेपण आहेत. सगळे मुसलमान एकट्या ओवेसीनं विकत नाहीत घेतले असं म्हणत ठाकरे यांनी एमआयएम पक्षावर टीका केलीय.

Leave a Comment