मुंबई | करोना व्हायरसचा वाढता धोका टाळण्यासाठी राज्यात कलम १४४ लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. आज मध्यरात्रीपासून संपूर्ण ३१ मार्चपर्यंत राज्यात लॉकडाउन करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनता कर्फ्यूनंतर सुद्धा न घराबाहेर पडण्यास सांगितलं आहे. राज्यातील एसटी, खासगी बस, मेट्रो, लोकल गाड्या बंद राहतील. मात्र, जीवनावश्यक सेवा सुरु राहणार आहेत.
परदेशातून येणाऱ्यांनी एकटं रहावं असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. गरज नसताना घराबाहेर पडू नका तसंच जी जी लोकं गेल्या १५ दिवसांमध्ये विदेशातून आली आहेत त्यांना समाजात फिरू नका, त्यांच्या संपर्कात तुम्ही आला असाल तर तुम्हीही समाजात फिरू नका असे आवाहन त्यांनी केले.
लॉकडाउन दरम्यान, अन्न धान्यांचा साठा करण्याची काहीही गरज नसून त्यासाठी सर्व जीवनाश्यक वस्तू पुरवणारी दुकान चालू राहतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शहरातील बस सेवा केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच सुरु राहणार आहेत. यापुढे करोनाचा विषाणू गुणाकार पद्धतीनं वाढणार आहे म्हणून अत्यंत काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगताना गरज पडली तर लॉकडाऊन ३१ मार्च नंतर वाढवण्याचे संकेतही उद्धव ठाकरे यांनी दिले. जीव वाचवणं आत्ता महत्त्वाचं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मंदिर, मशिदी आदी सगळी धार्मिक स्थळं बंद ठेवावीत असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी सर्वांना वर्क फ्रॉम होमचं आवाहनही केलं आहे. तसेच बंदच्या काळात घरी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी कंपन्यांना केलं आहे. महाराष्ट्र लॉकडाऊन असताना जीवनावश्यक वस्तूची दुकानं खुली राहतील. यामध्ये धान्य, किराणा, दूध, भाजी अशी दुकानं खुली राहतील.
पहा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नक्की काय घोषणा केली आहे –
ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.
हे पण वाचा –
घरात बसा! अन्यथा कारवाई करावी लागेल; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा
रस्त्यावर वाहने आणून कायदा मोडू नका- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची हीच खरी वेळ आहे – अविनाश धर्माधिकारी
स्वत:ला वाचवा, स्वत:च्या कुटुंबाला वाचवा! – पंतप्रधान मोदी
मुंबईसाठी धोक्याची घंटा! १२ तासात सापडले कोरोनाचे १० नवीन रुग्ण