शरद पवार यांनी यशवंतरावांना फसवलं – उद्धव ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची काँग्रेस आणि इंदिरा गांधींनी शेवटच्या काळात अवहेलना केली. शरद पवार यांनी यशवंतरावांना फसवलं..वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ते कराडमध्ये शिवाजी स्टेडियमवर महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या सांगता सभेत बोलत होते.

ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतो त्यांनी गमतीजमती करायच्या नसतात.. गाणी म्हणायची नसतात. लोकांची कामं करायची असतात असा टोला ठाकरे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना लगावला. उदयनराजेंच्या गाडीच्या नंबर वर टीका करताना उध्दव ठाकरे म्हणाले, खासदार हा खासदारासारखा असावा. आता 007 मधील फक्त 00 च राहणार आहे आणि महायुतीचे नरेंद्र पाटील विजयी होणार आहेत. असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी विराट सभेपुढे व्यक्त केला.

सर्व मुस्लिम ओवैसीच्या बापाचे नोकर नाहीत. देश प्रेमी मुस्लीमही या देशात आहेत. मी कश्मिरी देशप्रेमी सैनिक औरंगजेबच्या कबरीवर नतमस्तक होईन असाही टोला त्यांनी यावेळी लगावला. यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, आमदार शंभूराजे देसाई उपस्थित होते.