हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ujjivan Small Finance Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत चार वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता Ujjivan Small Finance Bank ने फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे.
05 नोव्हेंबर 2022 पासून नवीन दर लागू
Ujjivan Small Finance Bank ने आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात सुधारणा केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार 5 नोव्हेंबर 2022 पासून नवीन दर लागू झाले आहेत. हे सुधारित व्याजदर प्लॅटिना एफडी, डोमेस्टिक आणि एनआरओ फिक्स्ड डिपॉझिट्स आणि संपूर्ण निधी, RD आणि संपूर्ण लक्ष्य, NRE फिक्स्ड डिपॉझिट्सवर लागू आहेत.
‘या’ FD बाबत जाणून घेऊया
Ujjivan Small Finance Bank च्या वेबसाइटवरील माहितीनुसार, “15 लाखांपेक्षा जास्त आणि 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या डिपॉझिट्सना प्लॅटिना एफडीचे दर लागू होणार आहेत. हे लक्षात घ्या कि, हे प्लॅटिना डिपॉझिट्स TASC, नॉन-पर्सनल आणि NR ग्राहकांसह सर्व व्यक्तींसाठी उपलब्ध आहेत. आता बँकेकडून 12 ते 60 महिन्यांच्या FD वर 6.70% ते 7.40% पर्यंतचा व्याजदर दिला जातो आहे. त्याच वेळी, 80 आठवड्यांत (560 दिवस) मॅच्युअर होणाऱ्या Platina FD वर जास्तीत जास्त 8.20% व्याजदर दिला जाईल.
FD वरील व्याजदर जाणून घ्या
आता बँकेकडून 30 दिवस ते 89 दिवसांच्या FD वर 4.25%, 90 ते 179 दिवसांच्या FD वर 4.75%, 6 ते 9 महिन्यांच्या FD वर 5.50%., 9 महिने, 1 दिवस ते 12 महिन्यांच्या FD वर 6.50% तर 12 महिने 1 दिवस ते 559 दिवसांच्या FD वर 7.50% व्याजदर दिला जाईल.
अनेक बँकांनी FD चे दर वाढवले आहेत
अलीकडेच CSB बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक, Axis बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
रेपो रेट गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर
अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.ujjivansfb.in/support-interest-rates
हे पण वाचा :
EPFO च्या EDLI स्कीमअंतर्गत अशा प्रकारे मिळवा 7 लाख रुपयांचा फ्री इन्शुरन्स
Multibagger Stock : ‘या’ केमिकल स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला साडेतीन पट रिटर्न !!!
FD Rates : ‘या’ बँका FD वर देत आहेत जास्त रिटर्न, व्याज दर तपासा
आता फक्त एका कॉलमध्ये घरबसल्या अशा प्रकारे अपडेट करा Aadhaar Card !!!
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 100 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी आपल्या ट्रेनचे स्टेट्स तपासा