हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र गणेशोत्सव धुमधडाक्यात सुरु आहे. गणपती बाप्पाचा सर्वात आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक… त्यामुळे प्रत्येकाच्या घरी उकडीचे मोदक असणारच. तुम्हाला माहीत आहे का? उकडीचे मोदक चवीला जितके स्वादिष्ट असतात तितकेच ते आपल्या आरोग्यालाही फायदेशीर असतात. आज आपण जाणून घेऊया उकडीच्या मोदकाचे काही आरोग्यदायी फायदे.
रक्तदाबावर नियंत्रण-
उकडीच्या मोदकातील पोषक तत्त्वांमुळे शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. यामुळे हृदयाच्या नसांवरील तणाव कमी होऊन रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासही फायदेशीर ठरतात.
सांधेदुखी आटोक्यात ठेवते–
तुपा मधील काही घटक सांधेदुखीचा त्रास व अन्थ्राय्तीस समस्या आटोक्यात आणण्यास मदत होते. त्यामुळे मोदकांमध्ये तूप असल्यास गुडघ्याचे दुखणे कमी करण्यासाठी मोठी मदत होते.
कोलेस्ट्रॉल कमी प्रमाणात असते–
मोदक हा तांदूळ, खोबरं, गुळ, नारळ, सुका मेवा तसेच अनेक घटकांच्या मिश्रणाने बनलेला असतो. नारळ आणि सुकामेवा यामधील आरोग्यदायी घटक वाईट कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण कमी करतात तर चांगले कोलेस्ट्रेरॉल वाढवतात. त्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रोल कमी करण्यास मोदक फायदेशीर ठरू शकतात.
वजन कमी करण्यास मदत –
मोदक खाल्याने वजन कमी होण्यास मदत होते. होय, हे खरं आहे. कारण मोदकामध्ये फॅट्स आणि आवश्यक पोषणद्रव्य मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे वजन वाढण्याचा धोका नसतो. त्यामुळे बिन्दास्त मध्ये उकडीचे मोदक खा..