वृद्ध पत्नीला मारहाण करणाऱ्या बुवाविरोधात गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उल्हासनगर : हॅलो महाराष्ट्र – सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी स्वतःला बुवा आणि महाराज समजणाऱ्या गजानन चिकणकर याने आपल्या पत्नीला जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ वायरल झाला होता. या प्रकरणी या बुवाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर गजानन चिकनकरची पत्नीला मारहाण करण्याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला होता.

काय आहे प्रकरण
हा व्हिडिओ कल्याण तालुक्यातील द्वारली गावामधील आहे. या गावातील स्वतःला बुवा आणि महाराज समजणाऱ्या गजानन चिकणकर हा आपल्या पत्नीला जबर मारहाण करताना दिसत आहे. हि महिला काम करत नसल्याच्या कारणाववरून त्यांनी मारहाण केली होती. या व्यक्तीला दोन बायका असून तो भक्तांना ज्ञानाच्या गोष्टी सांगत प्रबोधन करत असतो. या व्हिडिओमध्ये आजुबाजुला असलेल्या इतर महिला आणि कुटुंबातील व्यक्तींनीही त्यांना अडवलं नाही.

https://www.facebook.com/watch/?v=812010939454098

हा व्यक्ती हा व्यक्ती पत्नीला वारंवार मारहाण करत परत असं करशील का? असा सवाल करत लाथेने तसेच हातात बादली घेऊन मारताना दिसत आहे. हा व्यक्ती एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने महिलेला हाताला धरुन ओढत भिंतीवर आदळलं आणि तिला घरातून बाहेर काढण्यासाठी तो ओढत असल्याचे दिसत आहे. या सगळ्या झटापटीत त्या वृद्ध महिलेच्या हाताला दुखापत झाली आहे. या सर्व प्रकरणाचा व्हिडिओ त्याच्या नातवानेच वायरल केला आहे. त्यानंतर आता बुवा पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गजानन चिकनकर याच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्याच्यावर आता काय कारवाई करण्यात येणार आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment