सरकारच्या ‘या’ योजनेअंतर्गत तुम्ही दरमहा 3000 रुपये घेऊ शकाल; कसे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्र सरकार असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी अनेक योजना राबवत आहे, त्यापैकीच एक म्हणजे प्रधानमंत्री श्रम योगी मान धन योजना. या योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेते, रिक्षाचालक, बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांचा वृद्धापकाळ सुरक्षित करण्यासाठी आर्थिक मदत केली जाईल.

या योजनेअंतर्गत सरकार कामगारांना पेन्शनची गॅरेंटी देते. या योजनेत तुम्ही दररोज फक्त 2 रुपये वाचवून वार्षिक 36000 रुपये पेन्शन मिळवू शकता. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊयात …

एका महिन्यात 55 रुपये जमा करावे लागतील
ही योजना सुरू केल्यावर, तुम्हाला दरमहा 55 रुपये जमा करावे लागतील, म्हणजेच दररोज 2 रुपयांपेक्षा कमी. यामध्ये, 18 व्या वर्षी दररोज सुमारे 2 रुपये वाचवून, तुम्हाला वार्षिक 36000 रुपये पेन्शन मिळू शकेल.

जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 40 व्या वर्षापासून ही योजना सुरू केली तर त्याला दरमहा 200 रुपये जमा करावे लागतील. तुम्हाला वयाच्या 60 वर्षानंतर पेन्शन मिळू लागेल. 60 वर्षांनंतर तुम्हाला दरमहा 3000 रुपये म्हणजेच वर्षाला 36000 रुपये पेन्शन मिळेल.

‘या’ कागदपत्रांची आवश्यकता असेल
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बँकेचे बचत खाते आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तससह व्यक्तीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

अशा प्रकारे रजिस्ट्रेशन करावे लागेल
यासाठी तुम्हांला कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये योजनेसाठी रजिस्ट्रेशन करावे लागेल. कामगार CSC केंद्रात पोर्टलवर स्वतःचे रजिस्ट्रेशन करू शकतात. सरकारने या योजनेसाठी वेब पोर्टल तयार केले आहे. या केंद्रांद्वारे ऑनलाइन सर्व माहिती भारत सरकारकडे जाईल.

ही माहिती देणे आवश्यक आहे
रजिस्ट्रेशनसाठी, तुम्हांला तुमचे आधार कार्ड, बचत किंवा जन धन बँक खाते पासबुक, मोबाइल नंबर आवश्यक असेल. याशिवाय संमतीपत्र द्यावे लागेल जे कामगाराचे बँक खाते असलेल्या बँकेच्या शाखेतही द्यावे लागेल, जेणेकरून त्याच्या बँक खात्यातून पेन्शनसाठी वेळेत पैसे कापता येतील.

Leave a Comment