हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Union Bank of India : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर आता जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. आता यामध्ये युनियन बँकेचे नावही सामील झाले आहे. कारण बँकेने ग्राहकांसाठी MCLR लिंक्ड कर्ज दरामध्ये बदल केला आहे. 11 ऑक्टोबरपासून बँकेचे हे नवीन व्याजदर लागू करण्यात आले आहेत.
नवीन दर जाणून घ्या
या व्याज दर वाढीनंतर, एक महिना, तीन महिने आणि सहा महिन्यांसाठीचा MCLR दर आता अनुक्रमे 7.30%, 7.50% आणि 7.70% असेल. याशिवाय, एक वर्षाचा MCLR, दोन वर्षांचा MCLR आणि तीन वर्षांचा MCLR अनुक्रमे 7.90%, 8.10% आणि 8.25% असेल. त्याच वेळी, ओव्हरनाईट MCLR साठी, बँकेकडून 7.15% दराने व्याज आकारले जात आहे. Union Bank of India
बँक ऑफ बडोदानेही दर बदलले
Union Bank of India व्यतिरिक्त, मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँक- बदलले आहेत. बँकेने सुधारित दर 12 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार असल्याची माहिती बँकेने दिली आहे.
या बँकांनी दरही बदलले
चलनवाढ रोखण्यासाठी RBI ने बेंचमार्क व्याजदर वाढवल्यानंतर एसबीआय आणि एचडीएफसीसहीत अनेक बँकांनी आपल्या रेपो लिंक्ड व्याजदरात वाढ केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने सोमवारी MCLR मध्ये 0.20 टक्के किंवा 20 बेसिस पॉईंट्सनी वाढवले. त्याचप्रमाणे, IDFC फर्स्ट बँकेचा MCLR रेटमध्ये 8 ऑक्टोबर 2022 पासून 9.50% आहे. बँक ऑफ बडोदाने देखील MCLR आधारित कर्ज दरात 10-15 पॉईंट्सने वाढ केली आहे. Union Bank of India
RBI ने व्याजदरात केली वाढ
हे लक्षात घ्या कि, RBI कडून मे महिन्यापासून आतापर्यंत सलग चौथ्यांदा रेपो दरात 190 बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे. रेपो दरातील कोणत्याही बदलाचा होम लोन वरील व्याजदरावर परिणाम होतो. त्यामुळे रेपो दरात वाढ झाल्यास होम लोनचा हप्ता देखील वाढेल. तसेच, MCLR, बेस रेट आणि BPLR शी जोडलेल्या जुन्या होम लोनवरही त्याचा परिणाम होईल. Union Bank of India
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.unionbankofindia.co.in/english/interestrates-loansadvances.aspx
हे पण वाचा :
Jio च्या 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगसहित मिळवा 2.5GB डेटा
‘या’ Multibagger Stock ने 700 टक्क्यांहून जास्त रिटर्न देऊन गुंतवणूकदारांना केले मालामाल
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
WhatsApp चे नवे फीचर, आता लवकरच 1 हजारांहून जास्त लोकांना ग्रुपमध्ये Add करता येणार
FD Rate : ‘ही’ हाउसिंग फायनान्स कंपनी FD वर देते आहे 7.50% पेक्षा जास्त व्याज