हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत 2024 बजेट सादर केले आहे. या बजेटमध्ये त्यांनी प्रत्येक क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. मुख्य म्हणजे, 2024 बजेटमध्ये निर्मला सीतारमण यांनी महिलांच्या विकासासाठी देखील काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. या घोषणांमुळे राज्यातील महिलांचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास सरकारने दाखवला आहे.
महिलांसाठी कोणत्या घोषणा? (Union Budget 2024)
- Union Budget 2024 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना सर्वाईकल कॅन्सरची लस दिली जाईल अशी घोषणा केली आहे.
- तसेच, लखपती दीदी योजनेंतर्गत देशामध्ये एक कोटी लखपती दिली बनल्या आहेत. त्यामुळेच आता या योजनेचे उद्दिष्ट 2 कोटींवरून 3 कोटी करण्यात आले आहे. या निर्णयामुळे 3 कोटी महीला लखपती दीदी बनणार आहेत.
- यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारने आशा वर्कर्स ला मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील सर्व आशा वर्कर्सचा समावेश आयुष्मान योजनेत करण्यात येईल अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. या गोष्टीमुळे आशा वर्कर्सला देखील आयुष्यमान योजनेचा लाभ घेता येणार आहे.
संसदेत बोलताना निर्मला सीतारमण म्हणाल्या की, “देशात महिलांसाठी अनेक योजना राबविण्यात येत असून त्यामुळे त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास होत आहे” दरम्यान, यंदाच्या अर्थसंकल्पात देशात 7 नवे IIT, 7 नवे IIM नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. तसेच, पुढील पाच वर्षांमध्ये मोदी सरकार ग्रामीण भागात दोन कोटी घरे उभारेल अशी घोषणा (Union Budget 2024) करण्यात आली आहे.