कंगनाच्या बचावात रामदास आठवले उतरले मैदानात; दिला ‘हा’ गंभीर इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्यामुळे कालपासून अभिनेत्री कंगना राणौतवर सर्व स्तरांतून टीकेचा भडिमार सुरु आहे. शिवसेनाकडून कंगनावर जोरदार टीका होत असताना मात्र, कंगनाही या टीकेला तितक्याच इर्ष्येने प्रत्युत्तर देत आहे. दरम्यान, कंगना राणावतने ( kangana ranaut) मुंबईवर टीका केली नसून राज्यसरकारवर टीका केली आहे, असं सांगतानाच मुंबईत येणाऱ्या कंगनाला कुणी अडवलं तर रिपाइं कंगनाला रिपाइं संरक्षण, असा इशारा रिपाइं नेते, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ( ramdas athawale) यांनी दिला आहे.

लोकशाहीत प्रत्येकाला टीका टिप्पणी करण्याचा अधिकार आहे. मत मंडण्याचे स्वातंत्र्य आहे. कंगना राणावतने मुंबईवर टीका केली नसून राज्यसरकारवर टीका केली आहे. टीका केली म्हणून तिला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका घेणे लोकशाही विरोधी आहे. कंगनाला भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार मुंबईत राहण्याचा अधिकार आहे. तिला कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन पक्ष कंगना राणावतला संरक्षण देईल, असं आठवले यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना राणावतला धमकी देणे योग्य नाही. कंगना राणावत यांनी सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात मांडलेली मते असो की सुरक्षा यंत्रणावरून राज्यसरकारवर केलेली टीका असो, याप्रकरणी कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका घेणे योग्य नाही. कंगनाला मुंबईत पाऊल ठेवण्यास कोणी विरोध करणार असेल तर रिपब्लिकन पक्ष कंगना राणावतचे संरक्षण करील. असा इशाराही त्यांनी दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

Leave a Comment