खरंच राम सेतू अस्तित्वात होता का?; संसदेत केंद्रीय मंत्र्यांनी केलं मोठं विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून राम सेतुच्या मुद्यावरून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे. विशेषत: अक्षय कुमारच्या राम सेतु चित्रपटानंतर यावरून मोठी चर्चा सुरू झाली आहे. रामायणात सांगितल्याप्रमाणे भगवान श्री राम यांनी सीतेची सोडवणूक करण्यासाठी भारतातून तामिळनाडूच्या किनारपट्टीपासून थेट श्रीलंकेला जोडणारा हा पूल बांधला. मात्र, हा पूल खरंच अस्तित्वात होता की ही फक्त एक दंतकथा आहे याबाबत संसदेत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत मोठं विधान केलं आहे.

भारताच्या ऐतिहासिक प्रश्नावरील चर्चवेळी राम सेतू या विषयावर हरियाणाचे अपक्ष खासदार कार्तिकेय शर्मा यांनी राज्यसभेत प्रश्न केला होता. यावर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, अद्याप रामसेतूच्या अस्तित्वाच्या कोणत्याही स्पष्ट खुणा सापडल्या नाही. तसेच सरकार सातत्याने प्राचीन द्वारका आणि अशा प्रकारणात संशोधन करत आहे. राम सेतुसंदर्भात बोलायचं, तर त्यात आमच्या काही मर्यादा आहेत. कारण यासंदर्भातला इतिहास जवळपास 18 हजार वर्षांपूर्वीचा आहे. आणि इतिहासकालीन दाखल्यांचा विचार करता या पुलाची लांबी 68 किलोमीटर इतकी आहे.

मात्र, त्या ठिकाणी असणाऱ्या अवशेषांमध्ये एक प्रकारचं सातत्य आपल्याला दिसून येतं. त्यावरून आपल्याला नक्कीच काही अंदाज बांधता येतील. असं जरी असलं, तरी तिथे नेमका पूलच होता किंवा त्या ठिकाणी नेमकं कोणतं बांधकाम होतं?, हे नेमकं सांगता येणं कठीण आहे. पण तिथे काही प्रत्यक्ष किंवा काही अप्रत्यक्ष खुणांवरून आणि अवशेषांवरून मात्र, असं म्हणता येईल की तिथे एक बांधकाम होतं, असे शिंह यांनी म्हंटले.