तरुणीवर गँगरेप झाल्याचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोहिमा : वृत्तसंस्था – देशात सध्या कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. त्यामध्ये आता महिलांवर होणारे अत्याचार यांसारख्या घटना घडत आहेत. त्यातच भर म्हणून आता या अत्याचाराचे व्हिडिओदेखील वायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडिओ वायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये १ महिला व ४ पुरुष एका महिलेला त्रास देताना दिसत आहेत.दरम्यान केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजीजू यांनी या घटनेसंदर्भात ट्वीट करत अपराध्यांना पकडण्यासाठी सर्व राज्यातील पोलिसांनी सहकार्य केलं पाहिजे असे आवाहन केले आहे.

काय म्हणाले केंद्रीय मंत्री किरण रिजीजू
‘ईशान्येकडील मुलीवर 4 पुरुष आणि एका महिलेने बलात्कार आणि अत्याचार केल्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ जोधपूर आत्महत्या प्रकरणाशी संबंधित नाही आहे. मी याप्रकरणी जोधपूरच्या पोलीस कमिशनरांशी बातचीत केली.’ या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी त्यांनी सर्व राज्यातील पोलिसांना आवाहन केले आहे. ते पुढे असं म्हणतात की, ‘या राक्षसांना पकडण्यासाठी सर्व राज्यातील पोलिसांनी सर्व प्रयत्न केलेच पाहिजेत.’ असे किरण रिजीजू यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणले आहे.

जोधपूर आत्महत्या प्रकरण?
काही दिवसांपूर्वी जोधपूरमध्ये एक आत्महत्याचे प्रकरण उघडकीस आले होते. यामध्ये 23 मे रोजी दिमापूरमधील एका 25 वर्षी नागा महिलेने आत्महत्या केली होती. तिने राजस्थानमधील जोधपूर याठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ती जोधपूरमध्ये ज्याठिकाणी भाड्याच्या घरात राहत होती त्याच ठिकाणी तिचा मृतदेह आढळून आला.

याच दरम्यान एका मुलीवर अत्याचार आणि बलात्कार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.तो व्हिडिओ या जोधपूरमधील घटनेशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत होते. या प्रकरणाची चौकशी केली असता एक वेगळेच सत्य समोर आले. दिल्ली पोलिसांचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि विशेष आयुक्त रॉबिन हिबू आयपीएस यांनी मृताच्या बहिणीने आणि पोलिसांनी व्हायरल झालेल्या व्हीडिओची पडताळणी केली असता या व्हिडीओतील महिला ही जोधपूमध्ये मरण पावलेली महिला नाही आहे असे आढळून आले. आसाम पोलिसांनी व्हिडीओच्या आधारे त्या पाच आरोपींचे फोटो माध्यमांमध्ये शेअर केले असून त्यांची ओळख पटवणाऱ्यांसाठी बक्षिससुद्धा जाहीर केले आहे.