सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
केंद्रीय सडक परिवहन, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज फलटणमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी फलटण-बारामती आणि लोणंद-सातारा या महामार्गाचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी मंत्री गडकरी नुकतेच दाखल झाले. यावेळी ढोल, ताशा घोडे, हत्ती यांच्याशी सहाय्याने त्यांचे स्वागत करण्यात आले.
फलटणमध्ये मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या विविध कार्यक्रमाला फलटणकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. फलटणमध्ये मंत्री गडकरींचे आगमन होताच खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांच्यावतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, विधान परिषदेचे माजी सभापती, आमदार रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांनीही उपस्थिती लावली.
साताऱ्यातील फलटणमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जल्लोषात स्वागत pic.twitter.com/4krPzD5dKl
— santosh gurav (@santosh29590931) January 27, 2023
यावेळी मंत्री गडकरींची फलटण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. भाजपचे खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांच्या वतीने भव्य अशा विविध विकासकामांचे व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ढोल ताशा व खास नृत्यांनी वेधले लक्ष pic.twitter.com/lToRMcOYpP
— santosh gurav (@santosh29590931) January 27, 2023