Thursday, March 23, 2023

अजित पवारांना ईडीच्या छाप्यांनी फारसा फरक पडणार नाही; रामदास आठवलेंचे महत्वाचे विधान

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांच्या कंपन्यांवर आयकर विभागाने मध्यन्तरी धाडी टाकल्या. त्यामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली. आता याबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महत्वाचे आणि मोठे विधान केले आहे. अजित पवार यांच्यावर ईडी, आयकर विभागाकडून जी छापेमारी केली जात आहे त्याचा पवार यांना फारसा फरक पडणार नाही,” असे आठवले यांनी म्हंटले आहे.

आरपीआयचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ईडी, सीबीआय आणि इतर काही संस्था केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. या यंत्रणांनी अजित पवार यांच्या कुटुंबियांवर टाकलेल्या छापेमारीमध्ये केंद्र सरकारचा किंवा भाजपचा कसलाही हस्तक्षेप नाही. या यंत्रणा स्वतंत्र स्वरूपाच्या आहेत.

- Advertisement -

ईडी, सीबीआय या यंत्रणांकडून महाराष्ट्रातील अनेक नेत्यांवर कारवाई करीत त्यांच्या मालमत्तेवर सतत छापेमारी करण्याचे काम केले जात आहे. ती छापेमारी करण्याऐवजी कारवाई लवकर करावी. मात्र, अशा प्रकारे वारंवार छापेमारी करू नये, असे मतही यावेळी मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.