Bank FD : खुशखबर !!! ‘ही’ स्मॉल फायनान्स बँक एफडीवर देत आहे 9.50% व्याजदर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत अनेकदा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. या दरम्यानच, आता खासगी क्षेत्रातील Unity Small Finance Bank सर्वसामान्य ठेवीदारांना FD वर 9% पर्यंत व्याजदर देते. त्याचप्रमाणे ही बँक ज्येष्ठ नागरिकांना वार्षिकरित्या 9.50% टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळत आहे. ही बँक ज्येष्ठ नागरिकांना 50 बेस पॉईंट्स अतिरिक्त व्याजदर देईल.

Unity Small Finance Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! स्पेशल FD वर  मिळेल 8.3% व्याज | Hello Maharashtra

सर्वसामान्य नागरिकांसाठीचे दर

Unity Small Finance Bank च्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, या खाजगी बँकेकडून 181-201 दिवसांच्या FD वर 8.75 टक्के, 501 दिवसांच्या FD वर 8.75 टक्के,तसेच 1001 दिवसांच्या FD वर 9 टक्के व्याज दर देत आहे. Bank FD

Unity Small Finance Bank Limited | Open Savings, FD, RD Accounts

ज्येष्ठ नागरिकांसाठीचे दर

इतर कोणत्याही बँकेप्रमाणे, Unity Small Finance Bank कडून ज्येष्ठ नागरिकांना FD वर 50 bps अतिरिक्त व्याज दर मिळत आहे. याचा अर्थ, जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने या बँकेत 181 ते 201 दिवस आणि 501 दिवसांसाठी एफडी केली तर त्याला वार्षिक 9.25 टक्के व्याज दिले जाईल. तसेच, 1001 दिवसांच्या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना 9.50 टक्के व्याज दर मिळेल. Bank FD

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

रेपो दरात सलग सहाव्यांदा वाढ

8 फेब्रुवारी रोजी RBI ने सलग सहाव्यांदा रेपो दरात वाढ केली. RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरण बैठकीनंतर बोलताना सांगितले की,” जगातील वाढत्या महागाईचा दबाव भारतावरही आहे आणि त्यावर पूर्णपणे मात करण्यासाठी पुन्हा एकदा कर्जाच्या व्याजदरात वाढ करणे आवश्यक झाले आहे. मात्र, यावेळी रेपो दरात केवळ 0.25 टक्के वाढ करण्यात आली आहे.” Bank FD

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://theunitybank.com/

हे पण वाचा :
New Business Idea : घरबसल्या कमी खर्चात ‘हे’ व्यवसाय सुरू करून दरमहा मिळवा हजारो रुपयांचे उत्पन्न
आता Yes Bank ची अनेक कामे Whatsapp वरच करता येणार, कसे ते समजून घ्या
Budget Cars : 10 लाखांच्या बजटमधील ‘या’ 5 उत्कृष्ट कार, फीचर्स अन् किंमत तपासा
आता Home Loan घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, घरबसल्या सहजपणे मिळवा पैसे
ड्यू डेटनंतरही पेनल्टीशिवाय भरता येते Credit Card चे बिल, जाणून घ्या RBI चे नियम