अन्यथा..राज्यात ‘कर्फ्यू’ लावावा लागेल- गृहमंत्री अनिल देशमुख

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनामुळे जमावबंदी असून सुद्धा लोकांमध्ये त्याचे गांभीर्य दिसत नाही आहे. जनता कर्फ्यू उठताच अनेक लोकांनी जमाव बंदीच्या आदेशाला धाब्यावर बसवत आपल्या खासगी वाहनाने रस्त्यावर गर्दी केली आहे. मुंबई-पुण्यासह राज्याच्या अनेक भागात वाहतुकीची कोंडी होत असून त्यामुळे गर्दीही होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागरिकांना कडक इशारा दिला आहे.

”राज्यात करोनाचा प्रादुर्भावावर लगाम लावण्यासाठी राज्यात १४४ कलम लागू करण्यात आलं आहे.त्यामुळं कृपा करून कोणीही घराबाहेर पडू नये. प्रशासनाला सहकार्य करावं. अन्यथा नाईलाजानं राज्यात कर्फ्यू लावावा लागेल” असा विनंती वजा इशारा कडक इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.

दरम्यान, आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांना पुन्हा एकदा घरात बसण्याचे, गर्दी टाळण्याचे आवाहन केलं आहे. ‘कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या. स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका. १४४ कलम लावलं आहे. त्यामुळं केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. रस्त्यांवर वाहनं आणून गर्दी करून कायदा मोडू नका,’ असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

 

Leave a Comment