Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसहीत एका वर्षासाठी मिळवा 5G डेटा

Jio
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Jio कडून ग्राहकांसाठी अनेक आकर्षक प्लॅन लाँच केले जातात. आताही जिओने वर्षभराची व्हॅलिडिटी असलेला 5G प्लॅन सुरु केला आहे. यामुळे आता ग्राहकांना 5G सेवेचा लाभही घेता येणार आहे. 2,999 रुपये किंमत असलेल्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 365 दिवसांसाठी हाय-स्पीड 5G डेटा मिळेल. जिओच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, या वार्षिक प्रीपेड प्लॅन अंतर्गत ग्राहकांना संपूर्ण वर्षासाठी एकूण 912.5GB (प्रतिदिन 2.5GB डेटा ) मिळेल. त्याचबरोबर या प्लॅनमध्ये Jio Apps चे फ्री सब्सक्रिप्शन देखील उपलब्ध असेल.

Jio Cheapest Plan Price under Rs 100 Benefits 3GB Data OTT Access and More  | Jio के इस Plan से अच्छा कुछ नहीं! 100 रुपये से कम में पाएं 3GB डेटा और

जिओचा 2,999 रुपयांचा प्लॅन

Jio च्या या वार्षिक प्रीपेड रिचार्ज प्लॅन अंतर्गत ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटा मिळेल. तसेच यामध्ये, ग्राहकांना 5G स्पीडसहीत 912.5GB डेटा म्हणजेच 2.5GB डेटा प्रतिदिन मिळेल. याशिवाय ग्राहकांना 75 GB चा अतिरिक्त डेटा देखील मिळेल. यासोबतच डेली 100 एसएमएस आणि सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगही देण्यात आले आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी संपूर्ण वर्षासाठी असेल. यासोबतच या प्लॅनमध्ये ग्राहकांना 365 दिवसांसहीत 23 दिवसांची अतिरिक्त व्हॅलिडिटी देखील मिळेल आहे.

Jio Rs 2999 Prepaid Recharge Plan

या प्लॅन मधील इतर फायदे तपासा

Jio च्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना Jio Apps जसे की Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चे कॉम्प्लिमेंटरी सब्सक्रिप्शन देखील मिळते. तसेच यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा ऍक्सेसची सुविधाही मिळते. म्हणजेच 2.5GB डेटा लिमिट ओलांडल्यानंतरही ग्राहकांना डेटा वापरता येईल. मात्र ब्राउझिंगचा स्पीड 64Kbps पर्यंत खाली येईल.

Reliance Jio is strongest brand in telecom sector: TRA

जिओचा नवीन Jio Plus प्लॅन

जिओकडून नुकतेच नवीन पोस्टपेड फॅमिली प्लॅन Jio Plus ही लाँच करण्यात आला आहे. ज्याअंतर्गत, ग्राहकांना पहिल्या महिन्यासाठी फ्री ट्रायल मिळेल. या प्लॅनमधील पहिल्या कनेक्शनसाठी, ग्राहकाला 399 रुपये द्यावे लागतील, यासोबत यामध्ये 3 अतिरिक्त कनेक्शन देखील जोडले जाऊ शकतील. कंपनीकडून या नवीन प्लॅनसहीत Jio True 5G वेलकम ऑफर देखील देत आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.jio.com/selfcare/plans/mobility/postpaid-plans-home/

हे पण वाचा :
Freedom 251 Scam : जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन घोटाळ्याविषयी जाणून घ्या
Kotak Mahindra Bank कडून ग्राहकांना मोठा धक्का, कर्जावरील व्याज दरात केली वाढ
EDLI Scheme म्हणजे काय ??? जाणून घ्या त्याच्याशी संबंधित ‘या’ खास गोष्टी
Aadhar Card अपडेट करण्यासाठी 14 जूनपर्यंत द्यावे लागणार नाहीत पैसे, अशा प्रकारे करा अपडेट
Komaki LY Pro : दोन बॅटरी असलेली ‘ही’ गाडी एका चार्जमध्ये देते 180 किमी पर्यंतची रेंज, किंमत जाणून घ्या