वृत्तसंस्था । ३१ मे ची संचारबंदी संपल्यानंतर पुन्हा संचारबंदी होणार की उठवली जाणार असे अनेक प्रश्न होते. या प्रश्नांची उत्तरे मिळाली असून आता ३० जूनपर्यंत ही संचारबंदी वाढविण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून याचा अनलॉक १.० असा उल्लेख करण्यात आला आहे. काही नियम शिथिल करण्यात आले असून कंटेन्मेंट झोनमधील नियम अद्याप शिथिल केले गेले नाहीत. पण हळूहळू हेही नियम शिथिल करण्यात येणार आहेत. आणि यामुळेच सरकारकडून याला लॉकडाउनच्या ऐवजी अनलॉक असे म्हणण्यात आले आहे. सध्या कंटेन्मेंट झोनबाहेर पूर्णतः सूट असणार आहे. राज्यातील गतिविधी टप्प्याटप्प्याने सुरु होणार आहेत. शाळा, महाविद्यालये, मॉल, धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक सभागृहही उघडले जाण्याची शक्यता आहे. तसेच कंटेन्मेंट झोनमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
#FLASH: Government issues new guidelines for phased re-opening of all activities outside containment zones for the next one month. Details to follow. #UNLOCK1 pic.twitter.com/g8CCnX23Hh
— ANI (@ANI) May 30, 2020
आतापर्यन्त सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी होती. या संचारबंदीचे नियम शिथिल केले जाणार असून कंटेन्मेंट झोनमध्ये आता रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. १ जूननंतर सर्व सूचना जरी केल्या जाणार आहेत. तसेच शाळा, महाविद्यालये आणि शिक्षणसंस्थाही सुरु करण्याबाबत सरकार विचार करत आहे. ८ जूनपासून अनेक राज्यातील धार्मिक स्थळे उघडली जाणार आहेत. बऱ्याच राज्यांमधून मॉल सुरु करण्याची मागणी होती. मॉल हि टप्प्याटप्प्याने सुरु केले जाणार आहेत. या संचारबंदीच्या दुसऱ्या टप्प्यात शाळा, महाविद्यालये उघडले जाण्याची शक्यता आहे. ८ जूनपासून काही राज्यांनी मागणी केल्याप्रमाणे हॉटेल, रेस्टारंट सुरु केले जातील. या सर्व काळात मात्र सार्वजनिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी असणार आहे. मात्र तिसऱ्या टप्प्यात परिस्थिती पाहून त्यांना मान्यता देण्यात येणार आहे.
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यावरील बंदी हटवली आहे. आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातही जाता येणार आहे. त्यासाठी आता परवानगीची आवश्यकता लागणार नाही आहे. या संचारबंदीचे जास्तीत जास्त अधिकार हे राज्य सरकारकडे राखून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे एखादे राज्य या परवानगी नाकारू शकते. पण सामाजिक अलगावचे नियम हे सर्वाना बंधनकारक असणार आहेत. मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडता येणार नाही आणि भौतिक अंतर पाळणे बंधनकारक असणार आहे.