हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या विचित्र फॅशनमुळे वारंवार चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदवर (Uorfi Javed) राग व्यक्त करत भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी तिच्या अटकेची मागणी केली होती. सार्वजनिक ठिकाणी नंगटपणा करणाऱ्या या उर्फी जावेदला तत्काळ बेड्या ठोकाव्या असं ट्विट त्यांनी केलं होत. यांनतर आता उर्फी ने सुद्धा चित्रा वाघ याना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
आजच्या राजकारण्यांना पाहून वाईट वाटते. लोकांच्या नजरेत येण्यासाठी मला टार्गेट करत आहे. बलात्कारासाठी माझ्या कपड्यांना दोष देणे, इतके सोयीचे आहे. नेहमीच पीडितेचे कपडे जबाबदार असतात. आणखी पण असे मुद्दे आहेत जसे कि बेरोजगारी, लाखो प्रलंबित बलात्कार प्रकरणे, खून.. या सगळ्याच काय..?’ असा सवाल उर्फी जावेदने चित्रा वाघ याना केला.
So sad to see politicians today . targeting me to be in public eye . Blaming my clothes for rapes , so convenient . It’s always the victims clothes . Aur bhi mudde hai jaise unemployment , lakhs of pending rape cases , murders . Uska kya ?
— Uorfi (@uorfi_) December 31, 2022
तुमच्यासारखे राजकारणी महिलांच्या सुरक्षेतील अडसर आहेत. जनतेला फक्त माझ्या विषयाचा वापर करून भरकटवणे. ज्या महिलांना मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी तुम्ही प्रत्यक्षात काही का करत नाही..? महिला शिक्षण, लाखो-लाखो प्रलंबित बलात्कार प्रकरणे? तुम्ही का नाही करत..? असा उलट सवाल तिने केला.
Politicians like you are a hind-crane to women safety . Janta ko sirf divert karna mere topic se , why don’t you do something actually for women who need help ? Women education , lakhs and lakhs of pending rape cases ? Why don’t you
— Uorfi (@uorfi_) December 31, 2022
चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या-
चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदचा एक व्हिडिओ शेअर करत तिच्या अटकेची मागणी करणारे एक ट्वीट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी मुंबई पोलिसांना टॅग करत म्हंटले कि, “अरे..हे काय चाललंय मुंबईत? ही बाई सार्वजनिक ठिकाणी नंगटपणा करत आहे. तिला रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडे काही कलमे आहेत की नाही? उर्फी जावेदला तत्काळ बेड्या ठोकाव्यात. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत. तर ही बया अजून विकृती पसरवतआहे,” असे ट्वीट चित्रा वाघ यांनी केले होते.