Uorfi Javed : … म्हणून मी पूर्ण कपडे घालत नाही; अखेर उर्फीने सांगितलं कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूड अभिनेत्री उर्फी जावेद (Uorfi Javed) आपल्या अतरंगी कपड्यांमुळे कायमच चर्चेत असते. तिच्या या हटके स्टाईलमुळे अनेकदा ती टीकाकारांचे लक्ष्य बनते. सध्या भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी मधील वादही चव्हाट्यावर आला आहे. त्यातच आता आपण पूर्ण कपडे का घालत नाही याचे कारण उर्फीने सांगितलं आहे.

uorfi javed

उर्फी जावेदने उर्फी जावेदने नुकतेच त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर काही व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती सांगत आहे की, जेव्हा ती जास्त कपडे घालते तेव्हा तिच्या शरीराला अॅलर्जी होते. उर्फी म्हणाली, मी कपडे का घालत नाही, कारण लोकरीचे कपडे घातल्याने तिच्या शरीरावर पुरळ उठतात. उर्फीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरी मध्ये हातापायाला पुरळ उठल्याचे फोटो सुद्धा दाखवले आहेत. पुरावा तुमच्या समोर आहे. म्हणूनच मी नूड राहते. माझ्या शरीराला कपड्याची ऍलर्जी आहे असं उर्फीने सांगितलं.

uorfi javed insta story

दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यावरून आक्रमक भूमिका घेत तिच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. तसेच उर्फी जावेदवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यावर उर्फीने सुद्धा चित्रा वाघ यांच्यावर जोरदार शब्दात पलटवार केल्याने राज्यात उर्फी जावेद विरुद्ध चित्रा वाघ असा नवा सामना गेल्या काही दिवसांपासुन सुरु आहे.