हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । EPF account : सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना PF खात्यामध्ये दर महिन्याला योगदान द्यावे लागते. जे खूप महत्वाचे आहे. तसेच हे योगदान आपल्या नियोक्त्याकडून दिले जाते. हे लक्ष घ्या कि, PF खाती ही EPFO द्वारे मॅनेज केली जातात.
PF खात्यासोबतच EPFO कडे कर्मचार्यांशी संबंधित संपूर्ण माहितीही असते. ज्यामध्ये कर्मचार्यांचा मोबाईल नंबर, नाव-ऍड्रेस, नॉमिनी डिटेल्स, बँक अकाउंट सारख्या माहितीचा समावेश असतो. जर एखाद्या कर्मचार्याने आपले बँक खाते बदलले असेल तर त्याला ते लगेचच पीएफ खात्यात अपडेट करावे लागेल. आता हे जाणून घ्या कि, EPFO कडून सर्व कर्मचार्यांना युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) जारी केला जातो. एखाद्या कर्मचार्याने आपली नोकरी बदलली तरीही त्याचा UAN बदलत नाही. जर आपल्याला बँक खाते अपडेट करायचे असेल तर हे काम फक्त UAN पोर्टलद्वारेच करता येईल. EPF account
अशा प्रकारे आपले बदललेले बँक खाते अपडेट करा
सर्वप्रथम युझरनेम आणि पासवर्डसह EPFO पोर्टलवर लॉग इन करा.
यानंतर वर दिलेला ‘Manage’ पर्याय निवडा.
यामध्ये खाली आल्यावर ‘KYC’ पर्याय निवडावा लागेल.
त्यानंतर डॉक्यूमेंट टाइपचा पर्याय विचारला जाईल ज्यामध्ये बँक निवडा.
यानंतर, आपले बँक खाते, IFSC कोड आणि इतर माहिती अपडेट करा आणि ‘सेव्ह’ वर क्लिक करा.
माहिती अपडेट केल्यानंतर ‘KYC pending for approval’ पर्यायावर जाऊन ते तपासता येईल.
जर सर्व काही बरोबर असेल, तर तुमच्या नियोक्त्याला डॉक्यूमेंट प्रूफ द्या, यानंतर बँक खाते अपडेट केले जाईल. EPF account
पोर्टलवर नवीन खाते दिसून येईल
आता आपल्याकडून डॉक्युमेंट दिले गेल्यानंतर एकदा का ते नियोक्त्याकडून व्हेरिफाय केले गेले तर आपल्याला EPFO पोर्टलच्या ‘Digitally Approved KYC’ पर्यायावर जाऊन अपडेट केलेले बँक खाते पाहता येईल. याशिवाय मंजुरी मिळाल्यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर एक SMS देखील येईल. EPF account
फक्त सॅलरी अकाउंटच लिंक करा
जर आपल्याला बँक खाते EPFO मध्ये अपडेट करायचे असेल तर त्यामध्ये फक्त सॅलरी अकाउंटच जोडले जावे हे लक्षात ठेवा. वास्तविक, नियोक्ता ज्या खात्यात पगार ठेवतो त्या खात्याशी संबंधित असलेल्या मोबाइल क्रमांकावरच पीएफ खात्याची माहिती येते. त्यामुळे आपल्या PF खात्यातील योगदानाचे अपडेट दर महिन्याला मोबाईलद्वारे उपलब्ध होईल. त्यामुळे सॅलरी अकाउंट लिंक करून आपल्याला या सुविधेचा योग्य फायदा घेता येईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://epfindia.gov.in/
हे पण वाचा :
Multibagger Stocks : घसरत्या बाजारातही ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला लाखोंचा नफा !!!
Post Office च्या ‘या’ योजनेद्वारे मिळवा दरमहा 5000 रुपये !!! कसे ते जाणून घ्या
Business Idea : सतत मागणी वाढणाऱ्या ‘या’ व्यवसायाद्वारे मिळवा लाखो रुपये !!!
Sukanya Samrudhi Yojana मध्ये अशा प्रकारे गुंतवणूक करून जमवा मोठी रक्कम !!!