नवी दिल्ली । जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमचा PF ही कापला गेला पाहिजे. रिटायरमेंटसाठी PF ची रक्कम खूप महत्त्वाची मानली जाते, ही रक्कम तुम्हाला रिटायरमेंटच्या वेळी खूप मदत करू शकते. म्हणून ती काढू नये असा सल्ला दिला जातो. मात्र सर्व डिटेल्स योग्यरित्या भरले असतील तरच तुम्ही PF मधून पैसे काढू शकता.
जर तुम्ही नोकरी बदलली असेल आणि बँक खाते अपडेट केले नसेल तर तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. आता तुम्ही घरबसल्या तुमच्या बँकेचे डिटेल्स अपडेट करू शकाल.
UAN द्वारे बँक डिटेल्स अपडेट करा
जर तुमचा जुना किंवा चुकीचा खाते क्रमांक EPFO मध्ये टाकला असेल, तर तुम्ही तुमचे नवीन बँक खाते UAN म्हणजेच युनिव्हर्सल अकाउंट नंबरद्वारे सहजपणे अपडेट करू शकता.
‘ही’ प्रोसेस आहे
>>सर्वप्रथम EPFO च्या वेबसाईटवर जाऊन लॉगिन करा.
>> आता वरच्या मेनूवरील ‘Manage’ टॅबवर क्लिक करा.
>> ड्रॉप डाउन मेनूमधून KYC पर्यायावर जा आणि डॉक्यूमेंट टाइप मध्ये Bank निवडा.
>> आता नवीन बँक खात्याचा खाते क्रमांक आणि IFSC कोड भरल्यानंतर save वर क्लिक करा.
>> आता तुमची रिक्वेस्ट KYC Pending for Approval म्हणून दर्शवेल.
>> आता आवश्यक कागदपत्रे तुमच्या कंपनीकडे जमा करा
>> कंपनीकडून मंजूरी मिळाल्यानंतर, तुम्हाला KYC Pending for Approval बदलून Digitally Approved KYC दिसेल.
अशा प्रकारे चेक करा PF बॅलन्स
>> EPFO सदस्य http://www.epfindia.gov.in या वेबसाइटला भेट द्या.
>> आता ‘Our Services’ टॅबमधून ‘For Employees’ पर्यायावर क्लिक करा.
>> सदस्य ‘Services’ टॅबमधून ‘Member Passbook’ वर क्लिक करा.
>> यानंतर तुम्ही लॉग इन करण्यासाठी तुमचा UAN आणि पासवर्ड टाका आणि तुम्हाला तुमच्या PF खात्याचे पासबुक पाहता येईल.