UPI : आता इंटरनेटशिवाय करता येईल UPI Payment, अशी आहे संपूर्ण पद्धत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जरा विचार करा कि, जर कोणत्याही UPI पेमेंट सर्व्हिसेसद्वारे ऑनलाइन पैसे पाठवताना मध्येच इंटरनेट कनेक्शन काही कारणास्तव बंद झाले तर… अशा वेळी *99#, USSD (अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्व्हिस डेटा) आधारित मोबाइल बँकिंग सर्व्हिस खूप उपयुक्त ठरेल. याद्वारे आपल्याला पैसे मागवता आणि पाठवता येतील, तसेच UPI पिन देखील बदलता येईल. याशिवाय आपल्याला इंटरनेट कनेक्शन नसले तरीही अकाउंट बॅलन्स तपासता येईल.

83 बँका आणि 4 टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडरद्वारे ऑफर केली जाणारी *99# सर्व्हिस देशभरातील सर्वांसाठी बँकिंग सर्व्हिस देते. हे हिंदी आणि इंग्रजीसह 13 वेगवेगळ्या भाषांमध्ये देखील वापरता येते. ते कसे वापरता येईल हे जाणून घेउयात…

अशा प्रकारे ऑफलाइन UPI ​​पेमेंट सेट करता येईल

स्मार्टफोन किंवा फीचर फोनवरून *99# डायल करा. मात्र हे लक्षात ठेवा कि, हा कॉल करण्यासाठी आपल्या बँक खात्याशी लिंक असलेला फोन नंबरच वापरावा लागेल, अन्यथा हे वापरता येणार नाही.

यानंतर, आपल्याला हवी असलेली भाषा निवडा आणि बँकेचे नाव टाका.

आपल्या नंबरशी लिंक केलेल्या बँक खात्यांची लिस्ट दाखवली जाईल, त्यामुळे योग्य पर्याय दाबून तुम्हाला वापरू इच्छित खाते निवडा.

आता, तुमच्या डेबिट कार्डचे शेवटचे 6 अंक एक्सपायरी डेटसह टाका.

एकदा ते सेट केल्यानंतर इंटरनेट कनेक्शनशिवाय UPI पेमेंट करता येईल.

 

अशा प्रकारे ऑफलाइन UPI ​​पेमेंट करता येईल

आपल्या फोनवरून *99# डायल करा आणि पैसे पाठवण्यासाठी 1 टाका.

आपल्याला हवा असलेला पर्याय निवडा आणि तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्याचा UPI आयडी / फोन नंबर / बँक खाते क्रमांक टाका.

त्यानंतर, रक्कम आणि तुमचा UPI पिन एंटर करा.

एकदा पूर्ण झाल्यावर, तुमचे पेमेंट यशस्वीरित्या केले जाईल,

सध्या, या सर्व्हिससाठीचे लिमिट 5,000 रुपये आहे आणि जास्तीत जास्त 0.50 प्रति ट्रान्सझॅक्शन चार्ज आकारला जाईल.

हे ही वाचा UPI द्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ 5 महत्वाच्या टिप्स

हे ही वाचा आता UPI द्वारे ATM मधून काढता येतील पैसे, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया

हे ही वाचा UPI Fraud पासून वाचण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी ते पहा

Leave a Comment