हिंदू राष्ट्र, तालिबान, महिलांच्या कपड्यांवर नियंत्रण; उर्फीचा ट्विट करत चित्रा वाघ यांच्यावर निशाणा

Uorfi Javed Chitra Wagh
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूड अभिनेत्री उर्फी जावेद हिच्या विरुद्ध भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कारवाईची मागणी केल्यानंतर उर्फी जावेदची आज अंबोली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी दाखल झाली. यावेळी उर्फीने तिला संविधावने कपडे परिधान करण्याचे स्वतंत्र्य दिले असल्याचे सांगितले. “एकीकडे त्यांना हिंदू राष्ट्र हवे आहे, तर दुसरीकडे महिलांच्या कपड्यांवर नियंत्रण ठेवण्याचे तालिबानी नियम लागू करायचे आहेत. हिंदू धर्म हा सर्वात जुना धर्म आहे, तो स्त्रियांच्या बाबतीत खूप उदारमतवादी म्हणून ओळखला जातो. मग तुम्ही कुठल्या संस्कृतीबद्दल बोलताय?”, असा सवाल उर्फीने ट्विटद्वारे उपस्थित केला आहे.

उर्फी जावेदने ट्विट करत नाव न घेता थेट चित्रा वाघ यांच्यावर आक्रमक हल्ला केला आहे. तिने ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “बलात्कार, डान्सबार आणि राजकारणी नेते महिलांना तिच्या कपड्यांमुळे मारण्याची उघडपणे धमकी देत आहेत. हा भारतीय संस्कृतीचा भाग नाही.

उर्फीने काही लेण्यांचे फोटो देखील ट्वीट केले असून “प्राचीन हिंदू स्त्रिया अशाप्रकारे पेहराव करत असत. हिंदू उदारमतवादी होते, शिक्षित होते, स्त्रियांना त्यांचे कपडे निवडण्याची मुभा होती, खेळ, राजकारणात त्यांचा सक्रिय सहभाग होता. ते लैंगिक आणि स्त्री शरीराबाबत सकारात्मक लोक होते. प्रथम भारतीय संस्कृतीबद्दल जाणून घ्या,” असा सल्ला उर्फीने नाव न घेता चित्रा वाघ यांना दिला आहे.