व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Urfi Javed Video : साडी नेसून उर्फीने केलं ‘असं’ काही की…व्हिडिओ झाला व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद आपल्या जबरदस्त लुक्ससह कायम चर्चेत असते. उर्फीचे फोटो आणि व्हिडिओ देखील अवघ्या काही मिनिटांतच व्हायरल होतात. आता पुन्हा एकदा उर्फीचा एक लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी आपल्या लेटेस्ट लूकमध्ये दिसत आहे.

हा व्हिडिओ झाला आहे व्हायरल
व्हायरल झालेल्या ‘या’ व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकाल की, साडीचा पदर उघडा ठेवण्याऐवजी किंवा प्लेट बनवण्याऐवजी उर्फी जावेदने त्याला दोरीसारखा पिरगाळला आहे. साडी घालण्याची तिची ही पद्धत उर्फीला आणखीनच बोल्ड टच देत आहे. यासोबतच उर्फी दोरीच्या उडी मारतानाही दिसत आहे.

https://www.instagram.com/p/Ccey2nhKYRE/?utm_source=ig_embed&ig_rid=c6a86804-a5f8-4519-ba51-8572772f37b4

साडी आणि हील्स घालून दोरीच्या उड्या
साडी आणि हाय हिल्स घालून उर्फी जावेदने ज्या पद्धतीने दोरीच्या उड्या मारल्या आहे ज्या नॉर्मल नाहीत आणि प्रत्येकजण असे करू शकणार नाही. अशा परिस्थितीत उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होतो आहे. तसेच फॅन्स तिच्या या स्टाइलचे खूप कौतुकही करत आहेत.

स्ट्रॅपी ब्लाउज असलेली फ्लोरल साडी
उफी जावेदच्या लूकबद्दल बोलायचे तर, यावेळी तिने फ्लोरल प्रिंट असलेली हलकी वजनाची साडी घातली आहे ज्यावर गुलाबी स्ट्रॅपी ब्लाउज घातला आहे. यासोबतच उर्फीने केसांच्या वेण्या काढून अंबाडा बनवला आहे.

फॅशन स्टेटमेंट चर्चेत
उर्फी जावेदने फार कमी वेळात फॅशन इंडस्ट्रीत मोठे स्थान मिळवले आहे. फोटोशूट असो किंवा स्पॉटेड लूक असो, प्रत्येक वेळी उर्फी आपल्या फॅन्ससाठी नेहमीच काहीतरी हटके करत असते आणि त्यामुळेच ती चर्चेचा विषय ठरते.

उर्फी जावेदचे प्रोजेक्ट्स
अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर उर्फीने आपल्या करिअरची सुरुवात हिंदी टीव्ही मालिकांमधून केली आहे. अभिनेत्रीने 2016 मध्ये ‘बडे भैया की दुल्हनिया’ ही मालिका केली होती. यानंतर उर्फीने अनेक मालिकांमध्ये काम केले, या अभिनेत्रीने बिग बॉस ओटीटीमधून खूप लोकप्रियता मिळवली. उर्फी जावेद आजकाल म्युझिक व्हिडिओंद्वारे आग लावत आहे. उर्फी जावेदला इंस्टा रील्स बनवण्याची खूप आवड आहे. ट्रेंडिंग गाण्यांवर ती डान्स करताना तसेच व्हिडिओ बनवताना नेहमीच दिसत असते.