हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाबळेश्वर हे असे ठिकाण आहे जे बारमाही मनाला तृप्त आणि संतुष्ट करीत असते. यामुळे पुणे मुंबई येथील कोरोना नियम शिथिल होताच अनेकांनी सहलीसाठी किंवा वीकेंड सुट्टीसाठी महाबळेश्वरकडे धाव घेतली आहे. परिणामी या परिसरातील निसर्गाचा आस्वाद घेणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दरम्यान या वाढत असलेल्या गर्दीबाबत प्रसिद्ध अभिनेत्री व शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी चिंता व्यक्त केली आहे. शिवाय सहलीला महाबळेश्वर पाचगणी येथे येणाऱ्या पर्यटकांनी कोरोनाबाबत सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री व शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर या आपल्या कुटुंबीयासोबत काही दिवसांपासून महाबळेश्वर पाचगणी परिसरातील एका बंगल्यामध्ये विश्रांतीसाठी मुक्कामी आहेत. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष यशवंतराव घाडगे यांच्यासह महाबळेश्वर येथील पत्रकारांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी चर्चा करताना त्यांनी पर्यटकांच्या वाढत्या गर्दीबाबत बोलताना चिंता व्यक्त केली. यावेळी विलास काळे, संजय दस्तूरे, अभिजित खुरासणे, प्रेषित गांधी, प्रभाकर देवकर, शिरीष गांधी, दिनेश फळणे आदी उपस्थित होते.
https://www.instagram.com/p/CQFZDEWJad1/?utm_source=ig_web_copy_link
पर्यटकांनी थोडा संयम पाळला पाहिजे. शिवाय कोरोनाबाबतची योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. त्यांनी मास्क बांधणे, गर्दी न करणे, सामाजिक अंतर पाळणे या बाबत योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. याचसोबत त्यांनी स्वतःची आणि आपल्या मुलाबाळांचीदेखील काळजी घेतली पाहिजे. तसेच महाबळेश्वर परिसरातील नागरिकांनाही काही होणार नाही याबाबत दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे, असे आवाहन पर्यटकांना केले आहे. पुढे म्हणाल्या कि, कोरोना अद्याप गेलेला नाही. काही भागात लॉकडाऊन काही प्रमाणात उठविला गेला असला तरी महाबळेश्वर परिसरात मजा करायला येणाऱ्या नागरिकांनी कृपया कोरोना बाबतची सावधानता बाळगा अशी कळकळीची विनंती केली आहे.