हिंमत कशी होते..? रामदेव बाबांच्या टरटर् वर उर्मिला मातोंडकरने ओढले तडतड ताशेरे

Ramdev Baba_Urmila Matondkar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गतवर्षापासून कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात कहर केला आहे. यात स्वयंघोषित डॉक्टर योगगुरू बाबा रामदेव यांचे अखंड उपदेश सुरु झाले आहेत. आपल्या औषधांनी आणि योग करून कोरोनावर सहज मात करणे शक्य आहे, असा दावा त्यांनी खुलेआम केला आहे. नाही तसं पाहता हे इथपर्यंत ठीक होते. पण यानंतर त्यांनी अ‍ॅलोपॅथी हे ‘मूर्ख विज्ञान’ असल्याचे गंभीर वक्तव्य केल्यानेसर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वक्तव्याने देशभर संतापाची लाट उसळली आहे. या लाटेत गुरफटून जाऊ याचा अंदाज आल्याने बाबा रामदेव यांनी त्यांचे विधान मागे घेतले. मात्र अद्यापही लोकांचा राग शांत झालेला नाही. आता अभिनेत्री व शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकरने देखील बाबा रामदेव यांच्यावर सडेतोड शब्दांत टीका केली आहे.

अभिनेत्री आणि शिवसेना पक्षनेत्या उर्मिला मातोंडकर हिने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करीत योगगुरू रामदेव बाबा यांचा चांगलेच फटकारले आहे. तिने या ट्विटमध्ये लिहिले आहे कि, या बिझनेसमॅनला एखाद्या कोव्हिड रूग्णालयात जायला हवे. तिथे डॉक्टर, फ्रंटलाइन वर्करसोबत २४ तास उभे राहून मग बयानबाजी करायला हवी. हे सर्वात अमानुष, संतापजनक तितकेच घृणास्पद वक्तव्य आहे. हे कुणाचे टूल किट आहे? त्यांची इतकी हिंमत होतेच कशी?’ असे ट्विट उर्मिलाने केले आहे. आपल्या या ट्विटसोबत उर्मिलाने बाबा रामदेव यांचा एक व्हिडीओसुद्धा शेअर केला आहे. उर्मिलांच्या या पोस्टवर सध्या नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्स केल्याचे आणि करीत असल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी तू बोलत आहेस. तू जे बोलतेयस ते योग्यच आहे. हा भोंदू बाबा आहे, असे म्हणत उर्मिलांच्या या ट्विटला समर्थन दिले आहे.

या वादाचे मूळ कारण म्हणजे रामदेव बाबा यांचे मूर्ख विधान. अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे, असे म्हणत रामदेवबाबांनी देशभरातून वाद ओढवला होता. हा वाद अंगलट आल्याचे कळताच त्यांनी हे वक्तव्य मागे घेत असल्याचेदेखील म्हटले होते. त्याच्या दुस-याच दिवशी त्यांनी डॉक्टरांची खिल्ली उडविली. १००० हून अधिक डॉक्टर कोरोना लसीचे दोन डोस घेऊनही मृत्यूमुखी पडले आहेत. ते डॉक्टर स्वत:लाच वाचवू शकले नाहीत, अशी डॉक्टरी काय कामाची. सोबत टरटर असा आवाज काढत डॉक्टर या शब्दाची देखील त्यांची कुचेष्टा केली आहे. पुढे डॉक्टर बनायचे असेल तर रामदेव बाबासारखे बना. ज्याच्याकडे कोणतीही डिग्री नाहीय, परंतू सर्वांचा डॉक्टर आहे. विदाऊट एनी डिग्री, डिग्निटी आय अ‍ॅम अ डॉक्टर, असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर भारतीय वैद्यकीय संघटनेने (आयएमए) कडकडून आक्षेप घेतला आहे. यामुळे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रामदेव बाबांना त्यांचे वक्तव्य मागे घेण्यास सांगितले होते.