हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सर्वत्र पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होताना दिसत आहे. खरंतर आपल्याकडे हा अत्यंत संवदेनशील मुद्दा आहे… वा… होता. होता म्हणायचे कारण असे कि पूर्वी चार सहा महिन्यांत पेट्रोलचे दर एखाद रूपया दोन रूपयाने वाढायचे. तेव्हा कसे देशातले एकही राज्य व त्या राज्यातील एकही प्रादेशिक नेता असा नसायचा जो या वाढीबद्दल केंद्र सरकारला लक्ष्य करण्याची संधी सोडात असेल. पण आताच्या सरकारने त्या नेत्यांचीही अडचण करून ठेवली आहे. कारण पेट्रोलचे दर रोज थोडे थोडे थोडे वाढतच आहेत. आधी ज्या दिवशी ते वाढायचे त्या दिवशी मोठी बातमी व्हायची. मात्र आजकाल ज्या दिवशी ते वाढले नाहीत, त्या दिवशी बातमी होते. याच संदर्भात केंद्र सरकार वर नेम धरून अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने बरोबर टोमणा मारला आहे.
वाह..क्या स्ट्राइक रेट है.. ⛽ https://t.co/oyv3nHtgoI
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) May 31, 2021
आजकाल राज्यात इंधन दरवाढ म्हणजे चेष्टाच झाली आहे. कधीतरी एखाद्या रुपयाने वाढणारे इंधन आजकाल शंभरी ओलांडून सुसाट कमावू लागलं आहे. बरे वाढ… पण किती..? तर ५-१० ठीक होत. पण आता मात्र डोक्यावर पाणी जायला लागलय. इंधनाने चक्क शंभरी ओलांडली. वाह वाह.. इंधनाची सुद्धा कशी सेन्च्युरी झाली आहे. असे असतानाही या दर वाढीबद्दल काही बोलले तर आपली अब्रू जाईल, अशी भिती अनेकांना वाटत असावी. पण या वाढीबाबत लोकप्रतिनिधी आणि अभिनेत्री असलेल्या उर्मिला मातोंडकरने मात्र तोंड उघडले आहे. ती सध्या शिवसेनेत कार्यरत आहे. या अगोदर ती कॉंग्रेसमध्ये होती. त्यामुळे केंद्र सरकार भाजपचे असल्याने तिला टीका करायला कोणती अडचण आली नाही. तिने ट्विटरवर केंद्र सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे.
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन 🙏🙏#जयमहाराष्ट्र pic.twitter.com/LINmwSHWEM
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) May 29, 2021
असेही चुकीच्या बाबींबद्दल कलाकार, साहित्यीक, विचारवंतांनी तोंड उघडणे हे बहुतांशी अपेक्षित असते. ती अपेक्षा उर्मिलाने मात्र तंतोतंत पूर्ण केली आहे. पेट्रोलने शंभरी गाठली आहे. डिझेलही त्याच मार्गावर आहे. सर्वसामान्य नागरिक ओरडताहेत, माल वाहतूकदार परेशान आहेत. पण सरकार त्याकडे दुर्लक्ष करते आहे. त्यामुळे आता उर्मिलानेच विषयाला हात घातल्यामुळे सरकारला यातून काहीतरी प्रेरणा मिळेल, अशी आणखी एक आशा बाळगूया. एखाद्या निर्मात्याला किंवा मग एखाद्या दिग्दर्शकालाही या शंभरीतून काहीतरी प्रेरणा मिळेल. तसे पाहता ट्विटर शो व्यतिरिक्त, रामगोपाल वर्मानेसुद्धा बऱ्याच दिवसांत एकही तडकता भडकत चित्रपट काढलेला नाही. मग हा विषय कसा राहील आगामी चित्रपटासाठी..?? हा त्याचाच वैयक्तिक विषय. पण तूर्तास तरी राज्यभरात इंधनाच्या दर वाढीबाबत उत्सव चालू आहे, त्यामुळे केंद्र सरकार असेच झोपून दिवस ढकलू शकते हे नक्की.