उर्मिला मातोंडकर लढणार ‘या’ मतदारसंघातून

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली प्रतिनिधी | काँग्रेसमध्ये प्रवेश केलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढणार आहे. यासाठी भाजपकडून खासदार गोपाळ शेट्टी हे उर्मिला यांचे प्रतिस्पर्धी असणार आहेत.

काँग्रेसमध्ये प्रवेश करतांना उर्मिला म्हणाल्या होत्या की, आपण लहानपणापासून महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांनी प्रभावित असल्याने काँग्रेसची निवड केली आहे. तर दुसरीकडे भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांचे असे म्हणणे आहे की, उर्मिला यांनीं निवडणूक लढवत आपल्याला एकप्रकारे मदत केली आहे. कारण उत्तर मुंबई मतदारसंघात आपणच अधिक मतांनी विजयी होणार असा त्यांना विश्वास आहे.

उत्तर मुंबईत याआधी अभिनेता गोविंदा यांनी काँग्रेसच्या तिकिटावरून लढवून विजय मिळवला होता. भाजपच्या राम नाईक यांना गोविंदा यांनी पराभूत केले होते. मात्र यावेळी उर्मिला मातोंडकर आणि गोपाळ शेट्टी यांची लढत कशी होते.  विजय कोणाच्या पारड्यात पडतो,  काँग्रेसला गेल्यावेळी सारखे यश मिळेल का ते पाहावे लागेल.

इतर महत्वाचे –

अमित शहा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत अर्ज भरणार…

राधाकृष्ण विखेंची भाजप खासदार दिलीप गांधींसोबत खोलीबंद चर्चा

कॉलर उडवायची टेंपररी स्टाईल करुन मला थांबायचे नाही, नरेंन्द्र पाटील यांचा उदयनराजेंना टोमणा