हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारी अमेरिकेच्या एअर फोर्सच्या एफ-१५ सी फायटर या विमानाला अपघात झाला. पूर्व इंग्लंडमधील ब्रिटिश रॉयल एअर फोर्स इथल्या बेसवरुन या एफ-१५ सी विमानाने नियमित सराव करण्यासाठी उड्डाण केले होते. मात्र उड्डाण केल्याच्या काही वेळानंतरच हे विमान उत्तरेकडे समुद्रात कोसळले. अमेरिकेच्या हवाई दलाची जगातील सर्वात शक्तीशाली हवाई दलांमध्ये गणना होते. त्यांच्याकडे एकाहून एक अधिक सरस फायटर विमाने आहेत जे युद्धामध्ये शत्रूच्या नाकी नऊ आणू शकतील.
“सोमवारी सकाळी सुमारे ९.४० च्या सुमारास आमचे एक एफ-१५ सी इगल विमान उत्तर समुद्रात कोसळले” अशी माहिती यूएस एअर फोर्सचे कॅप्टन मिरांडा टी सिमॉन्स यांनी यावेळी दिली. या अपघाताचे नेमके कारण आणि वैमानिकाबद्दलची माहिती अजूनही मिळू शकलेली नाही आहे. एएफपीने हे वृत्त दिले आहे.
ब्रिटिश एअर फोर्सकडून या अपघातग्रस्त विमानाचा शोध सुरु झाला आहे. सफोकमधील मिल्डनहॉल जवळच्या लेकनहीथ एअरबेसवरुन हे एफ-१५ या फाटयर विमानाने उड्डाण केले होते. मात्र पूर्व यॉर्क शायरच्या किनारपट्टीपासून १३७ किलोमीटर अंतरावर हे विमान कोसळले असे बीबीसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.