Banking Crisis : अमेरिकेतील बँकिंग संकट आता युरोपच्या उंबरठ्यावर, ‘ही’ दिग्गज बँक बुडण्याच्या मार्गावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Banking Crisis : अमेरिकेतील बँकिंग संकट आता युरोपच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. कारण अमेरिकेतील 2 मोठ्या बँका बुडलयनंतर आता युरोपमधील आणखी एक बँक क्रेडिट डिफॉल्ट होण्याच्या मार्गावर आहे. क्रेडिट सुईसनंतर आता डॉइश बँकेने गुंतवणूकदार आणि ठेवीदारांच्या चिंतेत भर घातली ​​आहे. या बातमीमुळे डॉइश बँकेच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली. खरं तर, बँकेचा क्रेडिट डिफॉल्ट दर हा गेल्या 4 वर्षांच्या उच्चांकावर गेला आहे.

Deutsche Bank Posts $924M Loss Amid Restructure | PYMNTS.com

ड्यूश बँकेच्या या वाईट बातम्यांमुळे, या बँकेचे शेअर्स गेल्या 2 दिवसांत 20 टक्क्यांहून अधिकने घसरल्याचे डिसिन येत आहे. क्रेडिट डिफॉल्ट स्वॅप्समध्ये वाढ झाल्यामुळे या बँकेचे शेअर्स 24 मार्च रोजी 14 टक्क्यांहून अधिकने तर 25 मार्च रोजी 6.5 टक्क्यांनी घसरले. हे लक्षात घ्या कि, ड्यूश ही जर्मनीची सर्वात मोठी बँक आहे. आता या बँकेवरच आर्थिक संकट ओढावल्याने युरोपमधील बँकिंग सिस्टीम कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Banking Crisis

Deutsche Bank's Historic Revamp Hit by Sagging German Economy - Bloomberg

जर्मन चान्सलरने गुंतवणूकदारांना दिले आश्वासन

“युरोपमधील बँकिंग व्यवस्था पूर्णपणे सुरक्षित असून गुंतवणूकदारांनी घाबरून जाण्याची गरज नाही,” असे जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांनी नुकतेच म्हटले आहे. ड्यूश बँक ही जर्मनीतील सर्वात मोठी बँक असल्याने ती देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावते. या बँकेचे इतर अनेक देशांमध्येही अनेक शाखा आहेत. जगातील सर्वात सुरक्षित बँकांपैकी ही बँक एक मानली जाते. तसेच या बँकेकडून कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गजांना कर्ज दिले जाते. या बँकेची एकूण मालमत्ता $1.4 ट्रिलियन इतकी आहे. Banking Crisis

380+ Deutsche Bank Stock Photos, Pictures & Royalty-Free Images - iStock |  Deutsche bank building, Banker, Wall street

बँकिंग संकट टाळण्यासाठी केले मोठे बदल

बऱ्याच काळापासून Deutsche Bank कडे गुंतवणुकदार लक्ष देऊन आहेत. क्रेडिट सुईस बँक ज्या प्रकारे संकटात अडकली आहे, तशीच काहीशी स्थिती डॉइश बँकेतही निर्माण झाली असल्याचे मानले जात आहे. या परिस्थितीचा विचार करता बँकेला कोणत्याही प्रकारच्या संकटातून वाचवता यावे यासाठी गेल्या काही वर्षांत बँकेच्या नेतृत्व पातळीवर मोठे बदल करण्यात आले आहेत. Banking Crisis

हे जाणून घ्या कि, याआधीही अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक बुडण्याच्या वृत्ताने जगभरातील बँकिंग क्षेत्र आणि शेअर बाजारात एकच गिंधलं उडाला होता. यानंतर स्वित्झर्लंडची क्रेडिट सुईस बँक बुडल्याची बातमी देखील बाहेर आली. यानंतर आता ड्यूश बँकेतील क्रेडिट डिफॉल्ट स्वॅप वाढल्यामुळे युरोप आणि अमेरिकेमध्ये बँकिंग संकटाचे ढग दाटून आले आहेत. Banking Crisis

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.db.com/

हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
Share Market मध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण, सेन्सेक्स 344 अंकांनी तर निफ्टी 71.15 अंकांनी खाली
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Multibagger Stock : फार्मा क्षेत्रातील ‘या’ दिग्गज कंपनीने गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये
आता First Republic Bank लाही लागणार टाळे, आठवड्याभरात अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोर