हॅलो महाराष्ट्र । नुकतच ‘द इकॉनॉमिस्ट’ या प्रसिद्ध मासिकाने आपल्या नव्या आवृत्तीत मोदी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. या आवृत्तीतील सर्वांत प्रदीर्घ लेख, ‘नेता’ हा अधिक जहरी आणि चर्चेचा विषय बनला आहे. या लेखात “पंतप्रधान मोदींमुळे भारतातील 20 कोटी मुस्लिम घाबरले आहेत कारण पंतप्रधान हिंदू राष्ट्र बनविण्यात व्यस्त आहेत.” असं सांगितलं आहे.
‘द इकॉनॉमिस्ट’च्या लेखानंतर आता प्रसिद्ध अमेरिकेतील उद्योगपती जॉर्ज सोरोस यांनी सुद्धा हिंदू राष्ट्रवादाच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. लोकशाही पद्धतीने निवडून आलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्धस्वायत्त मुस्लीमबहूल काश्मीरवर निर्बंध लादून हिंदूराष्ट्र निर्माण करीत आहेत, असा हल्ला जॉर्ज सोरोस यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर चढवला. दावोस येथील एका भाषणात होते. जॉर्ज म्हणाले, राष्ट्रवाद हा भारतासाठी सर्वात मोठा आणि भीतीदायक असा धक्का आहे. लोकशाही पद्धतीने निवडून आलेले मोदी भारताला हिंदू राष्ट्र बनवत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी काश्मीरवर निर्बंध लादले आहेत आणि कोटय़वधी मुस्लिमांना त्यांचे नागरिकत्व हिरावण्याची भीती दाखवत आहेत.
सोरोस यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरही भाष्य केले. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ‘आर्थिक पथक’ अर्थव्यवस्थेचा मुद्दा अधिक तापवत आहे, परंतु अशा प्रकारची कृती फार काळ सुरू ठेवता येत नाही. ट्रम्प खोटारडे आणि आत्मकेंद्री असून सर्व जगाने आपल्याभोवती फिरावे, असे त्यांना वाटते, अशी टीकाही सोरोस यांनी केली.
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”
हे पण वाचा-
तब्बल ५ महिन्यांनंतर जम्मू काश्मीरमध्ये २जी इंटरनेट सेवा सुरू; सोशल मीडियावर अजूनही बंदी
फेसबुकच्या मार्केटिंग संचालकपदी अविनाश पंत; भारतीय बाजारपेठेत स्थिरावण्यासाठी फेसबुकची नवी रणनीती
भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास NIAकडे देण्याचा केंद्राचा निर्णय असंवैधानिक – बाळासाहेब थोरात