वॉशिंग्टन । लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये हिंसक झडप निर्माण झाल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय त्याचे पातळीवर पडसाद उमटायला लागले आहेत. भारत-चीन वादात अमेरिकेनेही उडी घेतली आहे. आम्ही लडाख वादावर बारीक लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे आता चीनची काय भूमिका असणार याकडे लक्ष लागले आहे. आधीच चीन आणि अमेरिकेत कोरोना विषाणू प्रादुर्भावानंतर जोरदार शीत युद्ध सुरु आहे.
दरम्यान, हिंसक झडपेनंतर भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष दोन्ही देशांकडे लागले आहे. अमेरिकेच्या गृह विभागाने झालेल्या भारतीय जवानांबद्दल शोक व्यक्त केला आहे. अमेरिकेनंतर संयुक्त राष्ट्र संघाने चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव एंतोनियो गुतारेस यांनी भारत आणि चीनदरम्यानच्या संघर्षाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही देशांनी संयम ठेवावा, असे आवाहन त्यांनी केलं आहे. प्रत्यक्ष ताबारेषेवर तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात लष्करी स्तरावर चर्चा सुरु असतानाच, सोमवारी रात्री गलवाने खोऱ्यात अचानक हिंसक झडप झाली. त्यानंतर संघर्ष अधिकच चिघळला आहे.
दरम्यान, रात्री गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा हिंसक झडप झाली. त्यावेळी एक नवीन घटना समोर आली आहे. यावेळी काही सैनिक नदी तसेच दरीत कोसळून शहीद झालेत. चीनी सैन्य पूर्ण तयारीत आले होते. त्यांच्यासोबत लोखंडाचे रॉड आणि काही तोडलेल्या काटेरी तारा होत्या, अशी माहिती मिळत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”