वॉशिंग्टन । जागतिक आरोग्य संघटनेवर(WHO) चीनचं संपूर्णपणे नियंत्रण आहे, असा आरोप करत, या संघटनेसोबत अमेरिकेचे असलेले सर्व संबंध तोडत आहोत, अशी घोषणा अमिरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. WHO कोरोना विषाणूला सुरुवातीच्या स्तरावरच रोखण्यात अपयशी ठरली आहे, असा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी संघटनेतून बाहेर पडताना केला केला. कोरोना महामारीवरून याआधीही ट्रम्प यांनी संघटनेवर अनेक आरोप केले आहेत.
जगभरात कोरोना विषाणूमुळं झालेल्या मृत्यूंना जागतिक आरोग्य संघटना आणि चीनला दोषी ठरवलं आहे. वर्षाला केवळ ४० दशलक्ष डॉलर इतकी मदत देत असतानाही WHO वर चीनचं संपूर्णपणे नियंत्रण आहे. दुसरीकडे अमेरिका त्या तुलनेत वर्षाला ४५ कोटी डॉलरची मदत देत आहे. तरीही संघटना आवश्यक सुधारणा करण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळं आज आम्ही या संघटनेसोबत असलेले संबंध संपुष्टात आणण्याचा निर्णय घेत आहोत, असं ट्रम्प यांनी सांगितलं.
जागतिक आरोग्य संघटनेचा रोखण्यात आलेला निधी आता जगातील इतर आरोग्य संघटनांच्या मदतीसाठी वापरला जाणार आहे, असं सांगतानाच, ट्रम्प यांनी चीनविरोधात घेण्यात आलेल्या अनेक निर्णयांची यावेळी घोषणा केली. कोरोना चीनचा वुहान व्हायरस असल्याचं यावेळी ट्रम्प म्हणाले. चीननं हा वुहान व्हायरस जगभरात फैलावला. त्यामुळं जागतिक महामारीचं संकट कोसळलं. या व्हायरसनं एक लाखाहून अधिक अमेरिकी नागरिकांचा बळी घेतला. संपूर्ण जगभरात लाखो नागरिकांचा या व्हायरसनं जीव घेतला, असं ट्रम्प म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”