अमरावती । महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील एका सिक्योरिटी इंचार्जला कथितपणे महिलांची छेडछाड करणे चांगलेच महागात पडले. विनयभंगाचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी या 50 वर्षीय व्यक्तीला मारहाण केली. ही मारहाण इतकी जास्त झाली की तो जागीच बेशुद्ध पडला. नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 50 वर्षीय सुरक्षा प्रभारी अरुण गाडवे अमरावतीच्या रिम्स हॉस्पिटलमध्ये काम करत होते. तिथल्या महिला कर्मचाऱ्यांनी आरोप केला की, गाडवे ड्रेसचे मॅप घेण्याच्या बहाण्याने अश्लील कृत्य करत असे. एवढेच नव्हे, तर त्याने विरोध केल्यास त्यांना गोळ्या घालण्याची धमकी देखील दिली असा आरोपही त्याच्यावर करण्यात आला आहे. नंतर या महिलांनी गाडवेला धडा शिकवण्याची योजना तयार केली.
रिपोर्टनुसार, नंतर महिलांनी अरुण गाडवेबद्दल मनसे कार्यकर्त्यांकडे तक्रार केली. यानंतर गाडवेला मनसेच्या लोकांनी रस्त्यातच अडवले. त्यानंतर चौकशी केल्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. याशिवाय महिलांनी गावडेवर लाथा आणि बुक्क्यांचा वर्षावही केला. ही मारहाण इतकी झाली की, तो जागीच बेशुद्ध झाला. यानंतर गाडवेला कारमध्ये बसवून ते सर्वजण पोलीस ठाण्यात घेऊन गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.