पुढील पाच वर्षे अपक्ष म्हणून काम करणार; अर्ज दाखल केल्यानंतर उत्पल पर्रिकरांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपने उत्पल पर्रिकर यांना पणजीतुन उमेदवारी देण्यास नकार दिल्यामुळे त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान त्यांनी आज पणजीतून आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. पुढील पाच वर्षे आपण अपक्ष म्हणून काम करणार आहोत, अशी प्रतिक्रिया उत्पल पर्रिकर यांनी दिली.

भाजपचे जेष्ठ आणि दिवंगत नेते मनोहर पर्रिकर याचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी पणजीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. दरम्यान त्यांनी आज आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आता ते पणजीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहोत.

गोव्यासाठी भाजपकडून 34 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या या यादीत पणजीतून उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्याऐवजी त्यांना बिचोलीतून निवडणूक लढवण्याचा पर्याय देण्यात आला होता. त्यामुळे उत्पल पर्रिकरांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. दरम्यान त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.