व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

विराट कोहली पुन्हा कर्णधार होणार?; संघ अजूनही आशावादी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहली याने आयपीएल मधील रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र विराट कोहलीनेच आगामी आयपीएल मध्ये संघाचे नेतृत्व करावे यासाठी आरसीबी अजूनही आशावादी आहे. आम्ही विराट कोहलीचे मन वळवण्याचा प्रयत्न करू असे आरसीबीचे अध्यक्ष प्रथमेश मिश्रा यांनी सांगितले.

विराट कोहलीने अनेक संस्मरणीय हंगामात संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने अनेक सामने जिंकले आहेत. आम्हाला अजूनही तो कर्णधार म्हणून हवा आहे. आम्ही त्याला कर्णधारपद परत घेण्यासाठी त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न करू. जर त्याने कर्णधारपदाची भूमिका स्वीकारली, तर विराट कोहली पुन्हा आरसीबीचा कर्णधार होईल असे प्रथमेश मिश्रा यांनी म्हंटल.

दरम्यान, विराट कोहली गेल्या अनेक वर्षांपासून आरसीबीचे नेतृत्व करत आहे. तब्बल 8 हंगामात त्याने बंगळुरूची धुरा सांभाळली होती मात्र एकदाही आयपीएलचे विजेतेपद पटकवण्यात आरसीबीच्या संघाला यश आले नाही. त्यामुळे विराटने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.