नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमध्ये एकामोगोमाग एक अशा बलात्काराच्या तीन घटना घडल्या आहेत. यामधील एका घटनेत आरोपींनी नवऱ्यासमोरच पत्नी आणि मुलीवर सामूहिक बलात्कार केला आहे. हि घटना मुरादाबाद येथील बिलारी गावामध्ये घडली आहे.
हे कृत्य गावातीलच तीन गुंडांनी केले आहे. पीडित कुटुंब घरच्या अंगणात झोपलेले असताना हे गुंड बंदुकीच्या धाकाने पीडितांच्या घरात घुसले. यानंतर या गुंडानी कुटुंबाला मारहाण केली. यानंतर या गुंडानी महिलेच्या पतीचे हाथ पाय बांधले आणि त्याच्यासमोर त्याच्या बायकोवर आणि 11 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. तसेच याची तक्रार केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली आणि त्या ठिकाणहून फरार झाले.
या घटनेनंतर पीडित कुटुंबाने पोलिसात तक्रार दाखल करायचा प्रयत्न केला. मात्र त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही. तेव्हा या कुटुंबाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे याची तक्रार केली. त्यानंतर या गुंडांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.