उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशात एक भीषण अपघात (accident) झाला आहे. आज घटस्थापनेच्या दिवशीच हा भीषण अपघात (accident) झाला आहे. यामध्ये देवीच्या दर्शनासाठी मंदिरात जाणाऱ्या भाविकांची ट्रॅक्टर ट्रॉली तलावामध्ये उलटली आहे. या अपघातात (accident) 9 जण ठार झाले आहेत. तर 34 जण जखमी झालेत. तसेच काही काहीजण वाहून गेले आहेत. या अपघाताची (accident) माहिती मिळताच राज्य आपत्ती व्यवस्थापनाची टीम आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
Uttar Pradesh | A tractor's trolley got disbalanced and overturned in a pond in Itaunja. They were going to a temple. SDRF team rushed to the spot. 37 people rescued and are healthy. 10 people were declared dead at the hospital: Laxmi Singh, IG Lucknow Range pic.twitter.com/ZJFQZ4smhk
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 26, 2022
या अपघातातील (accident) जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रॅक्टर ट्रॉलीतील लोकांना सीतापूर येथील देवीच्या मंदिरात जायचं होतं. मुलाचं मुंडण करण्यासाठी सगळेजण देवळात जायला निघाले होते. मात्र वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे. हा अपघात (accident) इतका भीषण होता की 9 जणांचा ट्रॅक्टर ट्रॉलीच्या खाली दबून दुर्दैवी अंत झाला. तर 34 जण तलावाच्या पाण्यात बुडाले.
स्थानिकांच्या मदतीने एसडीआरएफच्या मदतीने तलावात पडलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. यातील काहीजण गंभीर जखमी आहेत. त्या रुग्णांची मृत्यूशी झुंज सुरु आहे. त्यामुळे या अपघातातील (accident) मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे पण वाचा :
DJ च्या गाडीवर अचानक पसरला करंट; नाचता नाचता तरुणांची झाली भयंकर अवस्था
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात; शिवशाही बस पलटी होऊन खड्ड्यात
Jasprit Bumrah आशिया चषक स्पर्धेला मुकणार ? समोर आलं ‘हे’ मोठं कारण
सपाच्या जिल्हा अध्यक्षांच्या गाडीला अपघात थोडक्यात बचावले, थरारक Video आला समोर
भाजप प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलारांच्या नावाची चर्चा?? तर चंद्रकांत पाटलांना…