उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना! अर्टिगा कार नदीत कोसळली, 9 जण ठार

accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – उत्तराखंडमध्ये एक भीषण अपघात (accident) झाला आहे. यामध्ये एक अर्टिगा कार नदीत वाहून गेली. ढेला नदीत ही कार कोसळली आणि वाहून गेली. यात दुर्घटनेत (accident) 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सहा महिला तर तिघा पुरुषांचा समावेश आहे. रम्यान, एकमेव महिला या भीषण दुर्घटनेतून (accident) थोडक्यात बचावली आहे. ती देखील सध्या शॉकमध्ये आहे. ज्या ठिकाणी हि दुर्घटना (accident) घडली त्या ठिकाणी सध्या बचाव कार्य सुरु आहे. या कार दुर्घनटेत मृत पावलेले सर्वजण पंजाबमधील आहेत. उत्तराखंडच्या नेनीताल येथील रामनगर इथं ही दुर्घटना घडली. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

एकटी महिला बचावली!
हाती आलेल्या माहितीनुसार, सकाळी 9 वाजेपर्यंत चार मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. तर कारमध्ये अजूनही 5 मृतदेह अडकल्याचं सांगण्यात आलं. हे मृतदेह काढण्याचे प्रयत्न सुरु होते. यादरम्यान बचावपथकाला एका महिलेला सुरक्षित वाचवण्यात यश आले असून तिला पुढील उपचारांसाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कारमध्ये पंजाबमधील पर्यटक
पंजाबमधील पर्यटकांनी भरलेली ही अर्टिका कार नदीत कोसळल्यामुळे मोठा अपघात (accident) घडला. हा अपघात नेमका कसा घडला हे मात्र अजून समजू शकलेले नाही. मात्र चालकाचं वेगावरील नियंत्रण सुटल्यानं किंवा चालकाचा डोळा लागल्यानं हा अपघात (accident) झाला असावा, अशी शंका व्यक्त केली आहे. या अपघाताचा (accident) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान

आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाला दुसरा धक्का, ‘या’ चुकीमुळे पाकिस्तानला झाला फायदा

खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे

नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार