औरंगाबाद – ज्या व्यक्तींनी अद्यापपर्यंत कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नाही, तसेच दुसऱ्या डोसची तारीख उलटून गेल्यानंतरही डोस घेतलेला नाही अशा नागरिकांकडून दंड आकरण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश औरंगाबाद महापालिकेने काढले आहेत. येत्या 15 डिसेंबरपासून ही कारवाई करण्यात येणार असून, यासाठी 500 रुपये दंड आकरण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वीदेखील औरंगाबाद शहरात लस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखविणाऱ्या नागरिकांनाच पेट्रोल देण्याचे आदेश काढण्यात आले होत्. त्यानंतर आता पुन्ही नव्याने आदेश काढण्यात आले आहेत. दंडातून जमा झालेली 50 टक्के रक्कम ही पोलीस प्रशासन आणि 50 टक्के रक्कम मनपा फंडात जमा करण्यात येणार आहेत. नव्याने जाहीर करण्यात आलेले नियम 15 डिसेंबरपासून लागू होणार आहे. महापालिकेकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाचा कसा परिणाम लसीकरणावर होतो हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी अत्यावश्यक वस्तू म्हणजे किराणा, स्वस्तधान्य, पेट्रोल, डिझेल आणि इतर वस्तू लसीकरणाचा पहिला डोस घेतल्याशिवाय मिळणार नाहीत असा निर्णय घेतला आहे. याशिवाय औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील शॉपिंग मॉल, किराणा मालाचे दुकाने, बहुमजली दुकाने, कापड दुकानांचे मॉल, बहु-उत्पादन विक्री दुकानामध्ये कोरोना लसीच्या पहिल्या डोसच प्रमाणपत्र दाखवणे आवश्यक आहे. तसेच पेट्रोल पंप, गॅस, रेशन दुकानात खरेदी करायचे असेल तर कोरोना लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक आहे.