हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. कोरोना लसीच्या नादात चाचण्या करण्याकडे आपलं दुर्लक्ष झाल्यानेच कोरोना वाढला अस मत मोदींनी व्यक्त केले. तसेच येत्या 11 ते 14 एप्रिलपर्यंत ‘लसीकरण उत्सव’ साजरा केला जाणार असल्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
आपल्याला कोरोना व्हायरससोबत कोरोना लसीशिवाय लढायचे आहे हे लक्षात ठेवायला हवे. यामुळे कोरोना चाचण्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कोरोना चाचण्या वाढवायला हव्यात, असे मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
11th to 14th April can be observed as 'Tika (vaccination) Utsav' for COVID19 vaccination: Prime Minister Narendra Modi pic.twitter.com/8PfY6EZftS
— ANI (@ANI) April 8, 2021
दरम्यान महाराष्ट्राने मोठ्या प्रमाणावर चाचण्या वाढविल्या असून आणखीही वाढविण्यात येत आहेत असा विश्वास देताना लसीचा जादा पुरवठा करावा तसेच इतर राज्यांतून ऑक्सीजन तसेच व्हेंटिलेटर्स देखील उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत केली. हाफकिनला लस उत्पादन करण्यासाठी परवानगी मिळायला हवी. यासाठी राज्य शासनाने पाठवलेल्या प्रस्तावाला लवकरात लवकर मान्यता मिळाल्यास लसीकरण आणखी वाढवता येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page