सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोरोना विषाणुचे संकट वाढत असल्याने लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू असताना नियमांची पायमल्ली करत वाधवान कुटुंबियांनी मुंबई, खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास केला होता. जिल्हाबंदीचे आदेश मोडून वाधवान यांनी सातार्यात प्रवेश केल्याने पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसेच महाबळेश्वरातील एका खाजगी शाळेत त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र आज दुपारी २ वाजता वाधवान बंधूंचा क्वारंटाइन काळ संपल्याने आता पुढे काय असा अनेकांना प्रश्न होता. यापार्श्वभुमीवर वाधवान बंधूंना ५ मे पर्यंन्त सातारा जिल्हा न सोड्ण्याचा आदेश CBI न्यायालयाने दिले आहेत.
वाधवान कुटुंबीय हे महाबळेश्वर चे नागरिक असल्याने उद्या पासुन ५ मे पर्यन्त वाधवान कुटुंब त्यांच्या महाबळेश्वरच्या वाधवान हाऊस मध्ये करणार पोलीस बंदोबस्तात वास्तव्य करणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच आज १४ दिवसाचा क्वारंटाईन कालावधी संपल्याने उद्या सातारा पोलिसांकडुन जिल्हाबंदी चे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, सातारा जिल्हा सोडण्याआधी वाधवान यांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची परवानगी घ्यावी लागणार अाहे. ३ मे पर्यन्तचा लाॅकडाऊन संपल्यावर CBI कडून पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे समजत आहे. आज वाधवाना प्रकरणावरही गृहमंत्री देशमुख यांनी फेसबुकच्या माध्यमातून भाष्य केले. आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या फार मोठ्या चुकीमुळे वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरला जाण्याची परवानगी दिली. त्या वाधवान कुटुंबाचा आज दुपारी २ वाजता क्वारंटाइनची वेळ संपतेय. त्यामुळे पोलीस खात्याकडून ईडी आणि सीबीआय यांना पत्र लिहून कळवलं आहे. आज दुपारी २ नंतर वाधवान कुटुंबाला ताब्यात घ्यावं. सीबीआयचे अधिकारी जो पर्यंत वाधवान कुटुंबाला ताब्यात घेत नाही तोपर्यंत ते आमच्या ताब्यात असतील अशी माहिती देशमुख यांनी दिली आहे.
पृथ्वीवर आणखीन एक मोठे संकट, ओझोन थराला पडलेय मोठे छिद्र#HelloMaharashtrahttps://t.co/yT96JZZylX
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 10, 2020