वयाच्या 22 व्या वर्षीच केली UPSC परीक्षा उत्तीर्ण; DIG वैभव निंबाळकर यांची यशोगाथा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण आपल्या अप्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर कितीही संकटे समोर आली की त्यावर मात करू शकतो. त्यासाठी जिद्द असावी लागते. आणि अशीच अधिकारी होण्याची जिद्द मनाशी बाळगून वयाच्या फक्त 22 व्या वर्षी UPSC परीक्षा उत्तीर्ण होत एक धाडसी अधिकारी होण्याची कामगिरी पुण्याच्या वैभव निंबाळकर यांनी करून दाखवली. आज यांची एक धाडसी अधिकारी म्हणून सर्वत्र ख्याती आहे. आपल्या कामगिरीमुले त्याची नुकतीच डीआयजीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुळचे पुण्याचे असलेले आसाम केडरचे भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकारी वैभव निंबाळकर यांची नुकतीच पोलिस महानिरीक्षकपदी बढती मिळाली आहे. निंबाळकर हे पुणे जिल्ह्यातील इंदापुर येथील तालुक्‍यातील सणसर गावचे रहिवासी आहेत. निंबाळकर हे “आयपीएस’च्या 2009 च्या तुकडीतील अधिकारी आहेत.

वैभव निंबाळकर

22 व्या वर्षी UPSC उत्तीर्ण

वैभव निंबाळकर यांची वयाच्या 22 व्या वर्षी युपीएसएसी उत्तीर्ण झालेले व भारतातील सर्वात तरुण आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी, अशी ओळख आहे. ते सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील मूळचे इंदापूर तालुक्यातील सणसर येथील असून त्यांचे शालेय शिक्षण बारामती येथे झाले आहे. एस.डी.पी.ओ, बोकाखाट म्हणून काम करताना आसाममधील डीजीपींकडून उत्कृष्ट नेतृत्व आणि आदर्श व्यावसायिक क्षमतेबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र मिळाले आहे.

वैभव निंबाळकर

“व्हिजीलन्स ऍन्ड ऍन्टी करप्शन” चे पोलिस अधिक्षक म्हणून कार्यरत

निंबाळकर हे आसाममधील कचार जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक असताना जुलै 2021 मध्ये आसाम-मिझोरम सीमावादातुन उसळलेल्या दंगलीत आसाम पोलिस दलातील 6 पोलिसांचा मृत्यु झाला होता. तर निंबाळकर यांना गोळ्या लागून ते जखमी झाले होते. उपचारातुन बरे झाल्यानंतर निंबाळकर पुन्हा सेवेत रुजु झाले. सध्या ते आसाम पोलिस दलात “व्हिजीलन्स ऍन्ड ऍन्टी करप्शन’ विभागाचे पोलिस अधिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

Vaibhav Nimbalkar

पहिल्याच प्रयत्नात IPS

वैभव निंबाळकर यांना लहानपणापासूनच वर्दीचे आकर्षण होते. त्यामुळे IPS झाल्याने त्यांना स्वत:चा आनंद गगनात मावेनासा झाला. वैभव यांना 12 वीला चांगले गुण मिळाले होते. त्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला होता. मात्र ते सोडून त्यांनी Bsc ला प्रवेश घेऊन यूपीएससीची तयारी केली. पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण होऊन देशात 204 वा नंबर मिळाला. या परीक्षेसाठी वैभव यांनी सोशॉलॉजी आणि मराठी साहित्य हे विषय घेतले होते. मराठी साहित्य आणि निबंध या लेखी परीक्षांमध्ये ते रँक होल्डर ठरले होते.

वैभव निंबाळकर

पहिलं पोस्टिंग आसाममधील बोकाखाटमध्ये

वैभव यांनी ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर 13 सप्टेंबर 2011 रोजी पहिलं पोस्टिंग आसाममधील बोकाखाट या जिल्ह्यात झालं. या ठिकाणीच भारतातील प्रसिद्ध काझीरंगा अभयारण्याचा बराचसा भाग आहे. हा भाग तसा दुर्लक्षित मानला जातो. शेजारील राज्ये-देशांमधून मोठ्या प्रमाणात घुसरखोरी होते. नक्षलवादी, माओवाद्यांच्या हिंसक कारवाया होतात. अशा भागात वैभव यांनी डॅशिंग काम केलं. त्यावेळी आसाममध्ये गेंड्याची तस्करी होत होती. ती वैभव यांच्या पथकाने हाणून पाडली.

उर्मिला निंबाळकर हिचे भाऊ

मराठी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिचे भाऊ

डिआयजी वैभव निंबाळकर हे मराठी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिचे भाऊ आहेत. मराठी- हिंदी मालिकांमधून घरोघरी पोहोचलेली व त्यानंतर आता यूट्यूबच्या माध्यमातून लोकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हि आपल्या भाऊवर खूप प्रेम करते. उर्मिला निंबाळकर ही मराठी युट्युबर आहे. जवळजवळ चार वर्षे झालं तिने या चॅनेलची सुरुवात केली आहे. युट्युब चॅनेल असो किंवा इन्स्टाग्राम उर्मिला नेहमीच विविध विषयांवरील माहिती देणारे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. अभिनेत्री उर्मिलाचे वैभव हे भाऊ आहेत.