Vande Bharat Express : 2024 मध्ये 60 वंदे भारत ट्रेन लाँच करण्याची सरकारची योजना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला संपूर्ण देशात प्रवाशांची मोठी पसंती मिळत आहे. लांबच्या प्रवासासाठी अत्यंत आरामदायी असलेली वंदे भारत ट्रेन नव्या भारताची खास गोष्ट बनली आहे. सध्या देशाच्या कानाकोपऱ्यात वंदे भारत ट्रेन चालवली जात असून यामुळे वाहतूक आणि दळणवळणाला चालना मिळत आहे. सध्या संपूर्ण देशात 41 वंदे भारत ट्रेन रुळावरून धावत असून 2047 पर्यंत 4,500 वंदे भारत ट्रेन चालवण्याची सरकारची योजना आहे. त्याच पार्श्वभूमीवर 2024 मध्ये आणखी 60 वंदे भारत एक्सप्रेस लाँच करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. या रेल्वे कोणत्या मार्गावर चालवल्या जातील हे आज आपण जाणून घेऊया.

कोणत्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) चालवायच्या ते भारतीय रेल्वे, राज्य सरकार आणि स्वतंत्र सल्लागार यांच्यातील चर्चेवर आणि स्टडी केसवर अवलंबून असेल. भारतीय रेल्वे वंदे भारत गाड्या अशा मार्गांवर सुरू करण्याचा विचार करत आहे जिथे हवाई संपर्क फार विस्तृत नाही किंवा खूप महाग नाही. विशेषत: कर्नाटक, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, बिहार आणि केरळ या राज्यांना सर्वाधिक वंदे भारत एक्सप्रेस मिळण्याची शक्यता आहे. जून 2024 पर्यंत सुमारे 18 नवीन मार्ग सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. त्यानंतर जुलै 2024 पासून दर पंधरा दिवसातून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस लाँच करण्याचा सरकारचा मानस आहे.

कोणत्या भागात चालवल्या जाणार वंदे भारत – Vande Bharat Express

एकूण 60 वंदे भारत एक्सप्रेस पैकी उत्तरेकडील राज्यांमध्ये 34 वंदे भारत ट्रेन आणि दक्षिण भारतातील मार्गांवर 25 नवीन गाड्या सुरू होऊ शकतात. यामध्ये मुंबई ते शेगाव, पुणे ते सिकंदराबाद, पुणे ते बडोदा, कोलकाता-रौरकेला, पुणे ते शेगाव, रायपूर ते वाराणसी या गाड्यांचा समावेश आहे.

सध्या संपूर्ण भारतात 41 वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Express) रुळावरून धावत आहेत. यामध्ये उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात प्रत्येकी 8, उत्तर पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेमध्ये प्रत्येकी 3, पूर्व मध्य रेल्वे, पूर्व किनारपट्टी रेल्वे, दक्षिण पूर्व रेल्वे आणि पश्चिम मध्य रेल्वे विभागात प्रत्येकी 2, आणि पूर्व रेल्वे, उत्तर पूर्व रेल्वे, ईशान्य सीमा रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आणि दक्षिण पश्चिम रेल्वे प्रत्येकी 1 वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे.